AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Father’s Day Special: OTT वर फादर्स डेचा आनंद दुप्पट करा, वडिलांसोबत पाहा हे 6 चित्रपट, तिसरा तर प्रचंड ब्लॉकबस्टर

वडील आणि मुलीचे नाते सुंदरपणे मांडणारे इंडस्ट्रीमधील 6 चित्रपट, जे तुम्ही फादर्स डे निमित्त आपल्या वडिलांसोबत एकत्र बसून पाहू शकता. तिसरा तर प्रचंड ब्लॉकबस्टर

Father's Day Special: OTT वर फादर्स डेचा आनंद दुप्पट करा, वडिलांसोबत पाहा हे 6 चित्रपट, तिसरा तर प्रचंड ब्लॉकबस्टर
| Updated on: Jun 20, 2026 | 5:54 PM
Share

21 जून 2026 रोजी देशभरात फादर्स डे साजरा केला जाणार आहे. या खास निमित्ताने अनेकजण आपल्या वडिलांसोबत वेळ घालवण्याचा आणि एकत्र चित्रपट पाहण्याचा बेत आखत आहेत. वडील आणि मुलीमधील प्रेम, विश्वास, त्याग आणि भावनिक नातं अधोरेखित करणारे काही उत्कृष्ट चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तर एक चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

फादर्स डेसाठी पाहण्यासारखे चित्रपट 1. ‘पिकू’

अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट वडील-मुलीच्या वास्तववादी नात्याचं सुंदर चित्रण करतो. मतभेद, भांडणं आणि दैनंदिन संघर्ष असूनही त्यांच्यातील प्रेम आणि जिव्हाळा मनाला भिडून जातो.

2. ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’

पंकज त्रिपाठी यांनी साकारलेला वडिलांचा रोल या चित्रपटाचा आत्मा आहे. मुलीच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारा आणि तिला प्रत्येक टप्प्यावर साथ देणारा पिता कसा असावा, हे या चित्रपटातून पाहायला मिळते.

3. दंगल

महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुली गीता-बबिता यांच्या संघर्षमय प्रवासाची ही प्रेरणादायी कथा आहे. समाजातील रूढी मोडून मुलींना यशस्वी करण्यासाठी वडिलांनी केलेला त्याग यात प्रभावीपणे दाखवला आहे.

4. Heyy Babyy

मुख्यतः विनोदी असलेल्या या चित्रपटात पितृत्वाची जबाबदारी आणि मुलीबद्दल निर्माण होणारी आपुलकी अतिशय भावनिक पद्धतीने मांडली आहे.

5. अंग्रेजी मीडियम

इरफान खान यांनी साकारलेला चंपक बन्सल आपल्या मुलीच्या परदेशात शिक्षण घेण्याच्या स्वप्नासाठी कोणतीही मर्यादा ओलांडायला तयार असतो. वडिलांच्या प्रेमाचा आणि त्यागाचा हा हृदयस्पर्शी प्रवास आहे.

6. ‘दृश्यम’

अजय देवगणचा प्रमुख भूमिका असलेला हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट असला तरी त्याचा गाभा एका वडिलांचं आपल्या मुलींसाठी असलेलं प्रेम आणि संरक्षणाची भावना आहे.

फादर्स डे अधिक खास बनवा

वडील आणि मुलीच्या नात्यातील प्रेम, संघर्ष, विश्वास आणि त्याग यांची जाणीव करून देणारे हे चित्रपट फादर्स डेच्या निमित्ताने कुटुंबासोबत पाहण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. मनोरंजनासोबतच हे चित्रपट नात्यांमधील भावनिक बंध अधिक दृढ करण्याचं काम करतात.

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप