Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईनंतर कसं मिळतंय चायनीज? केदार शिंदे म्हणाले, ‘रंग नाही हो एकदम…’
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे अनेक सकारात्मक बदल होताना दिसत आहेत. त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक देखील होत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एफडीएच्या कारवाईनंतर चायनीज कसं मिळतंय जाणून घ्या...

Tukaram Mundhe : महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईनंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु आहे. त्यांच्या या कारवायांमुळे राज्यात सकारात्मक बदल होत असल्याचं चिन्ह दिसून येत आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनेक हॉटेल्स आणि उपहारगृहांचे परवाने तुकारम मुंढे यांनी रद्द केले. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. पूर्वी चायनीजला रंग येण्यासाठी कृत्रिम रंग वापरले जायचे. पण आता चायनीज तयार करण्यासाठी कृत्रिम रंगांच्या जागी बिट आणि लाल मिरच्यांचा वापर केला जातो. यासाठी अनेकांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
सांगायचं झालं तर, सर्वच स्तरातून तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तुकाराम मुंढे यांचं कौतुक केलं आहे. आता मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत केदार शिंदे म्हणतात, ‘आज घरी हॉटेलमधून चायनीज मागवलं… एवढंच वाटलं, ‘तुका’ म्हणे चाजनीज ऐसेची खावे… रंग नाही हो! एकदम निरमा इफेक्ट…’, पुढे तुकाराम मुंढे यांनी टॅग करत केदार शिंदे कॅप्शनमध्ये म्हणाले, ‘Respect’, सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत.
तुकाराम मुंढे यांचं कौतुक फक्त केदार शिंदे यांनीच नाहीतर, याआधी ईशा तलवार आणि देवोलिना भट्टाचार्जी यांनी देखील तुकाराम मुंढे यांचं कौतुक केलं आहे. तुकारम मुंढे यांनी बॉलिवूडकरांवर देखील कठोर कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी FDA कडून अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) , अजय देवगण (Ajay Devgn) आणि टायगर श्रॉफ यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीमुळे सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
