AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC पेपर फुटी प्रकरणात महत्वाची अपडेट; संचालकासह किती जणांना घेतलं ताब्यात?

MPSC पेपर फुटी प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. संचालकासह आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

MPSC पेपर फुटी प्रकरणात महत्वाची अपडेट; संचालकासह किती जणांना घेतलं ताब्यात?
mpsc paper leak newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 27, 2026 | 10:28 AM
Share

गौतम बैसाने : MPSC पेपरफुटी प्रकरणात नवनवीन अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या पेपरसाठी 5 लाखांचा व्यवहार करून पेपर फोडल्याचा आरोप करण्यात येत आहे. नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीमधून एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नंदुरबारमधील पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई केल्याची माहिती हाती आली आहे. या प्रकरणी कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील, औषध निरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेली ऋतुजा पाटील, गौरव पाटील, ऋतुजाचे वडील अमृत पाटील आणि गौरवच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. एमपीएससीचा सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे देखील नंदूरबार तालुक्यातील धामळोड गावातील आहेत. गोपाळ मराठे यांनी नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीतून एमपीएससी पूर्व परीक्षेची तयारी केल्याची माहिती आहे.

पेपरफुटी प्रकरणात नंदुरबारमधून आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. प्रेमप्रकरणातून पेपरफुटी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात लकी पाटील उर्फ गौरव पाटील यांचा मोबाईल तपासला जाणार आहे. गौरव पाटील यांच्या मोबाईलसाठी मुंबई पोलीस त्यांच्या वडिलांना घेऊन नंदुरबार येण्याची शक्यता असून गौरव पाटील यांच्या मोबाईल देखील ताब्यात घेतला जाणार आहे. गौरव पाटील यांच्या वडिलांची विचारपूस मुंबई पोलीस दलाकडून केली जात आहे. त्यामुळे यात आणखी काही पुरावे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऋतुजाच्या वडिलांना मिळाला होता आदर्श शिक्षक पुरस्कार

MPSC पेपर लीक प्रकरणात संशयित आरोपी ऋतुजा पाटील यांचे वडील अमृत पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. ते नंदुरबारच्या शहादामधील जिल्हा परिषद शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नंदुरबार जिल्हा परिषदेकडून अमृत पाटील यांना २०२३-२४ या वर्षासाठी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. या MPSC औषध निरीक्षक पदाच्या पेपर लीक प्रकरणात अमृत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार