Anurag Kashyap | पूर्ण टक्कल, वाढलेली दाढी, अँजिओप्लास्टीनंतर निर्माता अनुराग कश्यप ओळखूही येईना

चारच दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात अनुरागवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली (Producer Anurag Kashyap angioplasty)

Anurag Kashyap | पूर्ण टक्कल, वाढलेली दाढी, अँजिओप्लास्टीनंतर निर्माता अनुराग कश्यप ओळखूही येईना
Anurag Kashyap

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. अनुराग कश्यपची प्रकृती कशी आहे, याची चाहत्यांना चिंता लागली आहे. अशातच अनुराग कश्यपची कन्या आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) हिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये अनुरागला ओळखताही येत नाही. छातीदुखीच्या त्रासानंतर अनुरागवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. (Film Producer Anurag Kashyap latest Photo after undergoing angioplasty daughter Aaliyah Kashyap shares)

आलियाने शनिवारी शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अनुरागचे पूर्ण टक्कल दिसत आहे. अनुरागच्या गळ्याभोवती काळ्या रंगाचा मास्क लटकत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतं. आलियाने त्याच्या चेहऱ्यावर झूम करताच, “मला काही दिसत नाही” असं अनुराग पुटपुटताना ऐकू येतो. त्यानंतर काही मुली हसता-खिदळताना पार्श्वभूमीवर ऐकू येतात.

अनुरागवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया

चारच दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात अनुरागवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या आठवड्यात अनुरागच्या छातीत दुखत होते. त्यानंतर त्याने आपले चेकअप करण्याचा निर्णय घेतला. या चेकअप दरम्यान अँजिओग्राफीवरून त्याच्या हृदयात काही ब्लॉकेज असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर तातडीने त्याला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

48 वर्षीय अनुरागला काही आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यूएसमध्ये शिकत असलेली अनुरागची कन्या आलिया सध्या मुंबईत आली आहे. आलिया ही अनुराग आणि त्याची पहिली पत्नी आदिती बजाज यांची कन्या आहे.

अनुरागची कन्या आलिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap)

नव्या चित्रपटाची तयारी

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अनुराग कश्यप पुन्हा एकदा अभिनेत्री तापसी पन्नूसोबत एक चित्रपट तयार करत आहेत. या चित्रपटात पवेल गुलाटी तापसीसह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या साय-फाय थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग यावर्षी मार्चमध्ये संपले आहे. अनुराग आणि तापसी यांनी यापूर्वी ‘मनमर्जियां’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

संबंधित बातम्या :

Anurag Kashyap | आधी छातीत वेदना आता अँजियोप्लास्टी, अनुराग कश्यपने दिली स्वतःच्या तब्येतीची अपडेट

(Film Producer Anurag Kashyap latest Photo after undergoing angioplasty daughter Aaliyah Kashyap shares)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI