AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच दिवशी अपघातांमध्ये दोन सेलिब्रिटींचं निधन; चक्काचूर झाली कार, रजनीकांत यांच्याकडून शोक व्यक्त

मंगळवारी दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दोन कलाकारांनी आपले प्राण गमावले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते आर. बी. चौधरी यांचं उदयपूरमधील कार अपघातात निधन झालं. तर मल्याळम अभिनेते संतोष नायर यांचाही मृत्यू झाला.

एकाच दिवशी अपघातांमध्ये दोन सेलिब्रिटींचं निधन; चक्काचूर झाली कार, रजनीकांत यांच्याकडून शोक व्यक्त
निर्माते आर. बी. चौधरीImage Credit source: Instagram
| Updated on: May 06, 2026 | 8:37 AM
Share

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दोन सेलिब्रिटींचं मंगळवारी एकसारख्याच अपघातात निधन झालं. एकीकडे 5 मे रोजी सकाळी मल्याळम अभिनेते संतोष नायर यांनी रस्ते अपघातात आपले प्राण गमावले, तर याच दिवशी दुपारी आणखी एक भीषण अपघात झाला. या अपघातात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आर. बी. चौधरी यांचं निधन झालं. तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये जवळपास 100 हून अधिक चित्रपटांची निर्मिती करणारे आर. बी. चौधरी यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. उदयपूरमध्ये त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात त्यांच्या गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु त्यांचा जीव वाचवता आला नाही.

आर. बी. चौधरी हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचं पार्थिव आज (6 मे) चेन्नईमध्ये आणलं जाईल आणि याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. सुपरस्टार रजनीकांत यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित आर. बी. चौधरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिलं, ‘माझे प्रिय मित्र, सुपर गुड फिल्म्सचे आर. बी. चौधरी हे एक उत्कृष्ट निर्माते होते. एक अद्भुत माणूस. त्यांनी असंख्य तरुण दिग्दर्शकांना संधी दिली. त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने मला मोठा धक्का बसला आहे. मी खूप दु:खी झालो आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.’

आर. बी. चौधरी यांनी 1988 मध्ये ‘सुपर गुड फिल्म्स’ नावाची स्वत:ची निर्मिती कंपनी सुरू केली. याच बॅनरखाली त्यांनी ‘अधिपापम’ हा पहिला मल्याळम चित्रपट त्यांनी बनवला. त्यानंतर त्यांनी तेलुगू आणि तमिळमध्येही चित्रपट निर्मिती सुरू केली. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘मॅरिसन’ हा होता, जो जुलै 2025 मध्ये प्रदर्शित झाला. ‘पुष्पा’ फेम फहाद फासिलने यात मुख्य भूमिका साकारली होती. आर. बी. चौधरी यांच्या काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये ‘लव्ह टुडे’, ‘जॉली’, ‘मिस्टर रोमियो’ आणि ‘एसीपी शिवा’ यांचा समावेश आहे.

मल्याळम अभिनेते संतोष नायर यांचंही मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या कार अपघातात निधन झालं. ते त्यांच्या पत्नीसोबत प्रवास करत होते. केरळच्या पथानामथिट्टा जिल्ह्यातील अडूरजवळील एनाथू परिसरात हा अपघात झाला. त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटलं आणि ती एका लॉरीला धडकली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि नंतर रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या अपघातात त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Follow Us
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
Nanded | दुष्काळ आढावा बैठकीत बदाम खाणारे संजय जाधव पत्रकारांवरच संतापले...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार