प्रसिद्ध गायकाच्या बंगल्यावर गोळीबार; ‘या’ कुख्यात गुंडानं स्वीकारली जबाबदारी

धक्कादायक... प्रसिद्ध गायकाच्या बंगल्यावर 'या' कुख्यात गुंडाच्या लोकांनी केला गोळीबार; फेसबुकवर भयानक पोस्ट करत म्हणाला, 'तुला कोणी वाचवू शकत नाही...', गायकाचे प्राण धोक्यात... याप्रकरणी पुढे काय होणार?

प्रसिद्ध गायकाच्या बंगल्यावर गोळीबार; 'या' कुख्यात गुंडानं स्वीकारली जबाबदारी
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 12:03 PM

मुंबई | 26 नोव्हेंबर 2023 : शनिवारी एका कुख्यात गुंडानं प्रसिद्ध गायकाच्या बंगल्यावर गोळीबार केला आहे. गायक सतत अभिनेता सलमान खान याचं प्रमोशन करत होता म्हणून गायकाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ज्या गायकाच्या घरावर गोळीबार झाला तो गायक दुसरा तिसरा कोणी नसून पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल आहे. गिप्पी ग्रेवाल याच्या बंगल्यावर झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने स्वीकारली आहे. लॉरेन्स बिश्नोई याची फेसबुक पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

लॉरेन्स बिश्नोई याने फेसबुकवर दावा केला आहे की, ‘आज लॉरेन्स बिश्नोई टोळीने व्हँकुव्हरच्या व्हाईट रॉक भागात गिप्पी ग्रेवाल यांच्या बंगल्यावर गोळीबार केला. सलमान खान याला तू सतत भाई – भाई म्हणून मोठे पणा देत आहेस… आता तुला वाचवायला आला का तुझा भाई.. दाऊद तुम्हाला मदत करेल असं तुम्हाला वाटत आहे… पण तुला आमच्यापासून कोणी वाचवू शकत नाही…’

पुढे लॉरेन्स बिश्नोई म्हणाला, ‘सिद्धू मूसवालाच्या मृत्यूला तुम्ही सर्वांना दुजोरा दिला. तो किती अहंकारी व्यक्ती होता… तुम्हाला माहिती आहे… किती गुन्हेगारांच्या तो संपर्कात होता… याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? आता जे झालं, तो ट्रेलर आम्ही तुम्हाला दाखवला आहे… सिनेमा लवकरच प्रदर्शित होईल.. कोणत्याही देशात पळण्याचा प्रयत्न कर… मृत्यूला कोणताही व्हीजा लागत नाही…’ लॉरेन्स बिश्नोई याच्या फेसबुक पोस्टमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा

लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीने अभिनेता सलमान खान याला देखील ई-मेलच्या माध्यमातून जिवेमारण्याची धमकी दिली होती. अभिनेत्याला धमकीचा ई-मेल आल्यामुळे अभिनेत्याला राज्य सरकारकडून सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. अभिनेत्याच्या घरा भोवती देखील सुरक्षा वाढवण्यात आली होती… तेव्हा देखील तुफान खळबळ माजली होती.

गिप्पी ग्रेवाल देखील प्रसिद्ध पंजाबी गायक आहे. गिप्पी ग्रेवाल याने देखील अनेक गाणी गात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आता मिळालेल्या धमकीमुळे गिप्पी ग्रेवाल याच्या जिवाला देखील धोका आहे.. असं म्हणायला हरकत नाही.. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होईल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.