Chirag Paswan – Arushi Nishank: चिराग पासवान अन् माजी CM च्या लेकीचे ‘ते’ फोटो व्हायरल; लग्नाच्या चर्चांवर पडदा उठताच आलं मोठं सत्य समोर!

Chirag Paswan - Arushi Nishank: केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यावर अनेक तरुणी फिदा आहेत. पण त्याच्या रिलेशनशिपची चर्चा माजी मुख्यमंत्री यांच्या लेकीसोबत रंगली आहे. एवढंच नाही तर, लग्नाच्या चर्चांनी जोर धरल्यानंतर मोठं सत्य समोर आलं आहे. सध्या सर्वत्र चिराग पासवान यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

Chirag Paswan - Arushi Nishank: चिराग पासवान अन् माजी CM च्या लेकीचे ते फोटो व्हायरल; लग्नाच्या चर्चांवर पडदा उठताच आलं मोठं सत्य समोर!
Arushi Nishank Chirag paswan
| Updated on: Nov 25, 2026 | 8:28 AM

Chirag Paswan – Arushi Nishank: केंद्रीय मंत्री चिराग पासवान हे सध्याच्या राजकारणातील धडाडीचं नेतृत्व आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ते खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. चिराग पासवान यांच्या नात्याची चर्चा माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकीसोबत सुरु आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांची लेक आरुषी निशंक हिच्यासोबत चिराग यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. आरुषी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ती झगमगत्या विश्वात सक्रिय आहे. आरुषी अभिनेत्री, मॉडेल आणि दिग्दर्शिका देखील आहे. गेल्या काही दिवसांपासून आरुषी देखील तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

चिराग पासवान यांच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्यानंतर दोघे लग्न कधी करणार… असे प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केले. आता रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत आरुषी हिने चिराग पासवान यांच्यासोबत कोणतेच खासगी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. सांगायचं झालं तर, आरुषी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. शिवाय सोशल मीडियावर आरुषी कायम ट्रोल देखील होत असते.

Loading...

आरुषी निशंक हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, चिराग पासवान यांच्यासोबतच्या नात्याच्या आणि लग्नाच्या अफवांवर मोकळेपणाने भाष्य केलं. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबाबतही अभिनेत्रीने स्वतःचा अनुभव शेअर केला. चिराग पासवान यांच्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली की, चिराग तिचे खूप चांगले मित्र आहेत आणि ते त्यांच्या आयुष्यात खूप छान प्रगती करत आहेत.

आरुषी हिने स्पष्ट केलं की, ती त्यांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी गेलेली. यावेळी अभिनेत्री सोबत एक पुस्तकही घेऊन गेलेली, जे तिने चिराग यांना भेट दिलं. पण या भेटीला सोशल मीडियावर वेगळाच रंग देण्यात आला. आरुषी हिने चिराग यांना भेट म्हणून एक पुस्तक दिलं. पण अनेकांना ती लग्नाची पत्रिका असल्याचं वाटलं

अभिनेत्रीचं असं देखील मत आहे की, दोन मित्रांमधील एक सर्वसामान्य भेट होती. सार्वजनिक जीवनात राहण्याचं आणि लोकांच्या नजरेत राहण्याचे जसे फायदे आहेत, तसेच त्याचे अनेक तोटेही आहेत. तोटे सांगताना अभिनेत्री म्हणाली की ती छोट्या-छोट्या गोष्टींवर ट्रोल होत राहते. आरुषी म्हणते की जेव्हा लोक इतके प्रेम देतात, तेव्हा अनेकदा गैरसमजही निर्माण होतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us