
बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करून नाव कमावलंय. मात्र असेही काही कलाकार आहेत ज्यांना हॉलिवूड प्रोजेक्ट मिळूनही त्यांनी नकार दिला. अनेक सेलिब्रिटींनी काही कारणं देऊन हॉलिवूडचे प्रकल्प नाकारले आहेत.

ही बाब समोर आल्यानंतर त्या कलाकारांना सोशल मीडियावर चाहत्यांकडून प्रश्न विचारण्यात आले की, शेवटी तुम्ही हॉलिवूडचा इतका मोठा प्रकल्प कसे नाकारू शकता? अनेक चाहत्यांनी सेलेब्रिटींना सोशल मीडियावर टॅग करून असं विचारलं. तर दुसरीकडे बॉलिवूड इंडस्ट्रीत असेही अनेक दिग्गज कलाकार आहेत ज्यांनी हॉलिवूडमध्ये धमाकेदार कामगिरी केली. दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा या अनेक हॉलिवूड प्रोजेक्टचा भाग आहेत.

तर हृतिक रोशननं 'पिंक पँथर 2' चित्रपटातील प्रमुख भूमिकेस नकार दिला होता. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन देखील झळकली होती. हृतिकनं वेळ नसल्यामुळे नकार दिल्याचं समोर आलं होतं. तो काही प्रकल्पांमध्ये व्यस्त असल्याच्याही बातम्या होत्या.

शाहरुख खानला 'स्लमडॉग मिलियनेअर' होस्ट करण्याची ऑफर आली होती. मात्र शाहरुखनं नकार दिल्यानं अनिल कपूर यांनी हा शो होस्ट केला होता.

'इम्मॉर्टल्स' या चित्रपटात प्रियंका चोप्राला एका महत्त्वपूर्ण भूमिकेची ऑफर होती. प्रियांकानं ही ऑफर नाकारली होती कारण तिच्याकडे शूटिंगसाठी वेळ नव्हता. बॉलिवूडच्या '7 खून माफ' च्या प्रोजेक्टमध्ये ती व्यस्त होती. मात्र त्यानंतर प्रियंकानं हॉलिवूडमध्ये धमाकेदार काम केलं आहे.

दीपिकानं 'फास्ट अँड फ्यूरियस 7' चित्रपटातील मुख्य भूमिका नाकारली होती. तिच्याकडे आधीपासूनच बरंच काम होतं आणि ती आपल्या कामातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात व्यस्त होती.

'ट्रॉय' हा चित्रपट 2004 साली रिलीज झाला होता. या चित्रपटात ऐश्वर्या रायला महत्त्वपूर्ण भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. मात्र तिनं ही भूमिका नाकारली होती.