AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला कोणीतरी स्वतःकडे खेचतंय…’, गडद अंधार सिनेमाचा थरारक ट्रेलर

'गडद अंधार' सिनेमातून प्रेक्षकांना एका थरारक कथेसोबत पाण्याखालील विश्व अनुभवता येणार आहे. नुकताच सिनेमाचं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

'मला कोणीतरी स्वतःकडे खेचतंय...', गडद अंधार सिनेमाचा थरारक ट्रेलर
'मला कोणीतरी स्वतःकडे खेचतय...', गडद अंधार सिनेमाचा थरारक ट्रेलर
| Updated on: Jan 18, 2023 | 11:49 AM
Share

मुंबई : मराठी सिनेमांमध्ये देखील नव-नवीन कथांवर आधारलेले सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता ‘गडद अंधार’ सिनेमातून प्रेक्षकांना एका थरारक कथेसोबत पाण्याखालील विश्व अनुभवता येणार आहे. नुकताच सिनेमाचं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलं आहे. सिनेमाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सिनेमाचं चित्रीकरण समुद्रात झाल्याचं दिसून येत आहे. शिवाय ट्रेलर पाहिल्यानंतर पुढे काय होणार अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे. सिमात नक्की काय होणार, संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ३ फेब्रुवारी पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या सर्वत्र ‘गदड अंधार’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

सिनेमात अभिनेत्री नेहा महाजन चिन्मयी ही भूमिका साकारताना दिसणार आहे. ट्रेलमध्ये नेहाचं अभिनय कौशल्य सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सिनेमात एक पेटी दाखवण्या आली आहे, या पेटी भोवती सिनेमाची संपूर्ण कथा फिरत आहे का? असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शिवाय नेहा ट्रेलरमध्ये म्हणते, कोणी तरी मला त्रास देत आहे… त्यामुळे सिनेमाचा थरार अनुभवण्यासाठी ३ फेब्रुवारी पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सिनेमात नेहा महाजन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नेहा हिच्यासोबत जय दुधाणे देखील सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘गडद अंधार’ दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शन प्रज्ञेश रमेश कदम यांच्या खांद्यावर आहे. सध्या सर्वत्र सिनेमाच्या थराराची चर्चा आहे.

‘गडद अंधार’ सिनेमात नेहा आणि जय यांच्यासोबत शुभांगी तांबळे, आकाश कुंभार, चेतन मुळे, आरती शिंदे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी वेळात लाखो व्ह्यूज सिनेमाच्या ट्रेलरला मिळाले आहेत. आता सिनेमाच्या प्रदर्शनाची उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर