Bigg Boss 19 Winner: बिग बॉस 19चा विजेता गौरव खन्नाकडे एकूण किती संपत्ती? मालिकेच्या एका एपिसोडसाठी किती घेतो मानधन
Bigg Boss 19 Winner: नुकताच बिग बॉस 19चा विजेता घोषित करण्यात आला. अभिनेता गौरव खन्नाने बिग बॉस 19चा ताज स्वत:च्या नावे केला. आता त्याच्या एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. यंदा बिग बॉसचे 19वे पर्व सुरु होते. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचा विजेता काल घोषीत करण्यात आला. लोकप्रिय अभिनेता गौरव खन्नाने बिग बॉस 19चा ताज स्वत:च्या नावे केला. सध्या सर्वत्र गौरव खन्नाची चर्चा रंगली आहे. त्याच्याकडे एकूण किती संपत्ती आहे? तो मालिकेच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
गौरव खन्नाने लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’, ‘सीआयडी’ आणि ‘ये प्यार ना होगा कम’ या मालिकांमध्ये काम केले आहे. तो मुंबईत पत्नी आणि अभिनेत्री आकांक्षा चमोलासोबत राहतो. गौरव हा प्रसिद्ध अभिनेता आहे. पण आता बिग बॉसमुळे त्याला आणखी लोकप्रियता मिळाली आहे. आता गौरव खन्नाकडे एकूण तिची संपत्ती आहे चला जाणून घेऊया…
गौरव खन्नाची एकूण संपत्ती किती?
समोर आलेल्या माहितीनुसार, गौरव खन्नाची अंदाजे नेट वर्थ 8 कोटी ते 15 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. त्याची कमाई टीव्ही मालिकांमधून, रिअॅलिटी शोमधून, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि सोशल मीडियावरील कोलॅबोरेशनमधून होते. इतके विविध स्रोत असल्यामुळे त्याची आर्थिक स्थिती खूप मजबूत आहे. गौरवचे मुंबईत स्वत:चे घर आहे. त्याला गाड्यांचे क्रेझ आहे. त्याच्याकडे ऑडी A6 आणि रॉयल एनफिल्ड या गाड्या असल्याचे बोलले जाते.
बिग बॉससाठी किती पैसे घेतले?
बिग बॉसच्या घरातही गौरव यंदाच्या सीझनमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याला दर आठवड्याला सुमारे १७.५ लाख रुपये मिळतात, म्हणजेच प्रति एपिसोड साधारण २.५ लाख रुपये. म्हणजेच चौदा आठवड्यांमध्ये त्याने तब्बल 2.45 कोटी रुपये कमावले आहेत. याआधी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्येही त्याने पर एपिसोड अंदाजे २.५ लाख रुपये घेतल्याचे सांगितले जाते. आता बिग बॉस १९ ची ट्रॉफी जिंकून त्याची नेटवर्थ आणखी वाढली आहे. त्याला बिग बॉस 19 ची ट्रॉफी आणि 50 लाख रुपयांचा धनादेश मिळाला आहे.
