गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये 1100 रुपयांना ‘सलाड’ अन् 950 रुपयांना मोमो; बाकीच्या पदार्थांची किंमत जाणून धक्काच बसेल
गौरी खानच्या रेस्टॉरंटची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसतात. पण लोकांना तिच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या मेन्यूबद्दल त्यांच्या किंमतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तिच्या रेस्टॉरंटंमध्ये मिळणाऱ्या पदार्थांच्या किंमती आता समोर आल्या असून त्यांची किंमत जाणून धक्काच बसेल. या किंमती नक्कीच सर्व सामान्यांना परवडणाऱ्या नाहीत.

बॉलिवूडचा “बादशाह” शाहरुख खानची पत्नी गौरी खान तिच्या इंटीरिअर डिझाईनसाठी तर चर्चेत असतेच पण आता ती तिच्या रेस्टॉरंटमुळे चर्चेत असते. कारण तिचे रेस्टॉरंटच्या इंटीरिअर बद्दल तर बोललं जातच पण त्याहीपेक्षा चर्चा होते ते तिच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या लक्झरी मेन्यूची. कारण या मेन्यूची किंमत वाचून अनेकांना धक्का बसेल.
गौरी खानचा ‘टोरी’ मधील लक्झरी जेवणाची झलक
गौरी खानचे मुंबईतील रेस्टॉरंट ‘टोरी’ केवळ त्याच्या आकर्षक सजावटीसाठीच नाही तर त्याच्या स्वादिष्ट पदार्थांसाठीही चर्चेत आहे. या सेलिब्रिटी हॉटस्पॉटच्या मेनू कार्डवरून उत्कृष्ट लक्झरी जेवणाची झलक दिसते, ज्याच्या किमती त्याच्या अर्थातच सामान्य माणसांच्या खिशाला परवडणाऱ्या नाहीत.
‘टोरी’ रेस्टॉरंटचे खास मेनू कार्ड
सोशल मीडियावर गोरीच्या ‘टोरी’ रेस्टॉरंटचे फोटो किंवा व्हिडीओ पाहिले असतीलच पण अनेकांना तिच्या रेस्टॉरंटमधील मेन्यूंबद्दल , त्यांच्या किमतीबद्दल जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता आहे. मेनू कार्डवर नजर टाकल्यास अनेक वेगवेगळ्या पदार्थांची नावे आणि त्यांच्या किंमती पाहून थोडं आश्चर्य वाटू शकतं. कारण या रेस्टॉरंटमध्ये सॅलेडची किंमत 900 ते 1000 च्या घरात आहे. जसं की समर वेजिटेबल सुईची किंमत तब्बल 950 ला रुपयांना आहे. तर ट्रफल एडामामे देखील 950 आणि 1500 रुपयांना आठ तुकड्यांचा विस्तृत तोरी व्हेज ग्योजा सेलेक्शन दिलं जातं. हे सर्व मोमोच्या प्रकारासारखेच आहे.
सॅलड 1100 रुपयांना
“टोरी” रेस्टॉरंटमध्ये विविध प्रकारचे सॅलड देखील उपलब्ध आहेत, सर्वांची किंमत मात्र नक्कीच जास्त आहे. एका आइसबर्ग सॅलडची किंमत 500 रुपयांपासून ते साशिमी सॅलडसाठी 1100 रुपयांपर्यंत, सॅल्मन, टूना आणि हमाची यांचे एक कॉम्बिनेशन आहे.
सीफूडची किंमत
स्नॅक्स आणि टेम्पुरा सेक्शन जेवणाचे ग्राहक 600 मध्ये एनोकी मशरूम टेम्पुरा आणि 750 मध्ये सिंगापूर चिलीसह लोटस रूटचा आनंद घेऊ शकतात. मांस आणि पोल्ट्री पर्यायांमध्ये चिकन याकिटोरी 800 रुपयांना उपलब्ध आहे तर मेनूमधील सर्वात महागडे पदार्थ, याकिनिकु एनझेड लॅम्ब चॉप, 3800 रुपये आणि मिसो ब्लॅक कॉड 4700 रुपये आहेत. तर सीफूड प्रेमींसाठी, नॉर्वेजियन सॅल्मनची किंमत 1,900 आहे, तर कोळंबी कुशियाकीची किंमत 650 आहे. येथे संपूर्ण मेनू पहा .
View this post on Instagram
रेस्टॉरंटबद्दलचा वाद
गौरी खानच्या प्रीमियम रेस्टॉरंट टोरीने त्याच्या स्वादिष्ट पदार्थांनी भरलेल्या मेनूने लक्ष वेधले आहे, परंतु अलीकडेच एका कंटेंट क्रिएटरने रेस्टॉरंटवर ‘बनावट’ पनीर दिल्याचा आरोप केल्यानंतर ते वादात सापडले.
एका मुलाखतीत आरोपांबद्दल बोलताना रेस्टॉरंट टोरीचे सह-संस्थापक अभयराज कोहली म्हणाले की, कडक स्वच्छता असते, उच्च दर्जाच्या रेस्टॉरंटमध्ये सर्व गोष्टींचे सातत्य राखणे आव्हानात्मक असू शकते. पण आम्ही आमच्या पद्धतीने ते पाळतो.
शेफ स्टीफन गॅडोट यांनीही या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की या घटनेमुळे व्यवसायात अनपेक्षित वाढ झाली आहे. ते म्हणाले, “यामुळे आमच्या व्यवसायात वाढ झाली आहे आणि माझे इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढले आहेत. हा वाद एक वरदान ठरला आहे.” शेफ स्टीफन गॅडिट यांनी पुढे स्पष्ट केले की चर्चेनंतर, कंटेंट क्रिएटरला समस्या समजली आणि त्यांनी पोस्ट डिलीट केली. ते म्हणाले, “आम्हाला वाटते की लोक काय चालले आहे ते समजून घेण्याइतके बुद्धिमान आहेत.”
गौरी खान एक यशस्वी उद्योजक
गौरी खान इंटीरियर डिझायनर म्हणून तर प्रसिद्ध तिने अनेक सेलिब्रिटींची घरे आणि आलिशान कार्यालये डिझाइन केली आहेत. पण आता गौरी खान एक यशस्वी उद्योजक देखील आहे. तिच्या रेस्टॉरंटच्या मेन्यूचीही आता तेवढीच चर्चा होतं आहे.
