नवरा करीयर करत असेल तर, बायकोने…, लग्नाच्या बदलत्या अटींवर सुनील शेट्टीचं मोठं वक्तव्य

Suniel Shetty on Marriage: 'नवरा करीयर करत असेल तर, बायकोने...', लग्न, करीयर, आणि आजच्या मुलांच्या विचारांवर सुनील शेट्टीचं मोठं वक्तव्य, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुनील शेट्टी याच्या वक्तव्याची चर्चा...

नवरा करीयर करत असेल तर, बायकोने..., लग्नाच्या बदलत्या अटींवर सुनील शेट्टीचं मोठं वक्तव्य
फाईल फोटो
| Updated on: Jul 27, 2025 | 10:20 AM

Suniel Shetty on Marriage: अभिनेते सुनील शेट्टी यांनी नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आजच्या काळात तरुणांसाठी लग्नाचा बदलता अर्थ याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सुनील शेट्टी पत्नी माना शेट्टी यांच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. त्यांच्या दोन मुलांचं आयुष्य देखील आनंदी आहे. सुनील शेट्टी म्हणाले की, एका विशिष्ट वेळेनंतर, लग्नात फक्त परस्पर समंजसपणा आणि तडजोड महत्त्वाची असते. जर पती करिअर करत असेल तर महिलेने मुलांची काळजी घेतली पाहिजे. असं देखील सुनील शेट्टी म्हणाले.

नुकताच झालेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले, ‘आजच्या मुलांमध्ये धैर्य नाही. लग्नाच्या काही दिवसांनंतर फक्त परस्पर समंजसपणा आणि तडजोड महत्त्वाची असते. एकमेकांना समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. एकमेकांसाठी जगणं फार महत्त्वाचं असतं.’

‘वैवाहिक आयुष्य जगत असताना आयुष्यात एका बाळाचं आगमन होतं. बायकोला एक गोष्ट कळणं फार महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे नवरा करीयर करत असेल तर बायकोने मुलांचा सांभाळ केला पाहिजे. आजच्या काळात सर्वच गोष्टींचा प्रचंड दबाव आहे…’

 

 

‘आता लग्नाच्या आधी घटस्फोट होतात…’

सुनील शेट्टी म्हणाले, ‘आता प्रत्येकाला सल्ला द्यायचा आहे. व्हर्चुअल जग तुम्हाला सांगतं की, आई कसं व्हायचं, वडील कसं व्हायचं… काय खायचं आणि चांगलं आहे. मला असं वाटतं की आपण अनुभवातून शिकलं पाहिजे… आपली आजी, आई, बहीण आणि सारसच्या मंडळींकडून मार्गदर्शन घ्यायला पाहिजे… खूप काही झपाट्याने बदलत आहे. आता लोकं लग्न करण्याआधी घटस्फोट घेत आहेत.’ असं देखील सुनील शेट्टी म्हणाले.

सुनील शेट्टी यांचं खासगी आयुष्य

सुनील शेट्टी यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, 1991 मध्ये अभिनेत्याने माना शेट्टी यांच्यासोबत लग्न केलं. मानाचं खरं नाव मोनिशा कादरी होते आणि ती मुस्लिम होती, त्यामुळे कुटुंब लग्नाच्या विरोधात होते. सुनील शेट्टीने मानाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण तिने त्याच्या कठीण काळातही अभिनेत्याला सोडले नाही.