Good Bye | रश्मिका बनणार बिग बींची मुलगी, बाप-लेकीच्या हळव्या नात्याची कथा सांगणार ‘गुडबाय’!

‘गुडबाय’ या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाविषयी सध्या बरीच चर्चा रंगली आहे.

Good Bye | रश्मिका बनणार बिग बींची मुलगी, बाप-लेकीच्या हळव्या नात्याची कथा सांगणार ‘गुडबाय’!
रश्मिका आणि बिग बी

मुंबई : ‘गुडबाय’ या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाविषयी सध्या बरीच चर्चा रंगली आहे. अलीकडेच या दोघांनी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात या दोघांच्या नेमक्या काय भूमिका असणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, आता निर्मात्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. या चित्रपटात दोघे कलाकार एखादे रोमँटिक जोडपे म्हणून दिसणार नाही तर, बाप-लेक म्हणून दिसणार आहेत (Good Bye film story line Rashmika will play Amitabh bachchan daughter in film).

मात्र, या चित्रपटाची कथा या दोन कलाकारांभोवतीच फिरते आहे कि कथेत आणखी काही जोड असणार आहे? हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. तर, कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता ही शूटिंग किती दिवस चालेल आणि चित्रपट नेमका कोणत्या माध्यमात प्रदर्शित होईल, याची कल्पना सध्या देता येणार नाही.

‘नॅशनल क्रश’साठी खास चित्रपट!

‘नॅशनल क्रश’ ठरलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आता बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवणार आहे. एकामागून एक मोठे चित्रपट रश्मिकाच्या पदरात पडले आहेत. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमवेत रश्मिका पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. ‘गुडबाय’ या चित्रपटात रश्मिका आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसणार आहेत (Good Bye film story line Rashmika will play Amitabh bachchan daughter in film).

कधी सुरु होणार चित्रपटाचे शूटिंग?

अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती की, त्यांच्या डोळ्यामध्ये त्रास होत असून, लवकरच शस्त्रक्रिया होईल. माहिती देताना अमिताभ यांनी ‘गुडबाय’ या नव्या चित्रपटाविषयीही अपडेट दिली होती. बातमीनुसार, ‘गुडबाय’ पुढील आठवड्यापासून सुरु केला जाणार आहे. अर्थात 5 किंवा 6 एप्रिलपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.

चित्रपटाच्या मुख्य भागाचे चित्रीकरण चंदीगडमध्ये होणार आहे. तसेच, शहरातील चित्रीकरणासाठी काही भाग मुंबईतील एका स्टुडिओमध्ये बनवण्यात आले आहेत. पहिले वेळापत्रक सुमारे एक महिना सुरु असणार आहे. तर, त्यानंतर कलाकार चंदिगड आणि हरिद्वार येथे स्वतंत्र कार्यक्रमांसाठी जातील. याआधी पहिले शेड्युल 23 मार्चपासून सुरू होणार होते.

अमिताभ बच्चन यांच्यासमवेत रश्मिका मंदानाचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल करणार असून, चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करत आहे. या दिग्दर्शक-निर्माता जोडीने यापूर्वी ‘लुटेरा’ आणि ‘उडता पंजाब’ सारखे सर्वोत्कृष्ट चित्रपट केले आहेत. ज्यानंतर आता प्रत्येकजण या चित्रपटाविषयी खूप उत्सुक आहे. इतकेच नाही तर, या चित्रपटाविषयी बोलताना एकता कपूर म्हणाली की, या चित्रपटात आपल्याला भावना आणि करमणुकीचे अनेक रंग पाहायला मिळतील. हा संपूर्ण चित्रपट कौटुंबिक चित्रपट असणार आहे.

(Good Bye film story line Rashmika will play Amitabh bachchan daughter in film)

हेही वाचा :

संजय लीला भन्साळींच्या मदतीला धावून आला बॉलिवूडचा ‘सिंघम’, पूर्ण केले ‘गंगूबाई…’चे चित्रीकरण!

Kareena Kapoor Baby Boy Pic : रणधीर कपूर यांनी चुकून शेअर केला तैमूरच्या भावाचा फोटो, पाहा कसा दिसतो चिमुकला नवाब…

Published On - 1:50 pm, Tue, 6 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI