निशब्द… आठवडाभरापूर्वी आम्ही… अक्षय कुमारसह अनेकांनी वाहिली असरानींना श्रद्धांजली

Govardhan Asrani Passed Away: बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी कलाकार गोवर्धन असरानी यांचे आज निधन झाले आहे. आज मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अक्षय कुमारसह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

निशब्द... आठवडाभरापूर्वी आम्ही... अक्षय कुमारसह अनेकांनी वाहिली असरानींना श्रद्धांजली
Asrani and Akshay Kumar
| Updated on: Oct 20, 2025 | 10:43 PM

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी कलाकार गोवर्धन असरानी यांचे आज निधन झाले आहे. आज मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. आज दुपारी 4 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 1967 मध्ये ‘हरे कांच की चुडियाँ’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केल आहे. त्यांच्या निधनानंतर अक्षय कुमारसह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अक्षक कुमारने वाहिली श्रद्धांजली

अक्षय कुमारने गोवर्धन असरानी यांना श्रद्धांजली वाहताना लिहिले की, ‘असरानीजींच्या निधनाने मी निशब्द आहे. आठवडाभरापूर्वीच ‘हैवान’ चित्रपटाच्या शुटींगवेली आम्ही एकमेकांना मिठी मारली होती. असरानी हे खूप चांगले व्यक्ती होते. त्यांच्याकडे खास कॉमिक टायमिंग होते. माझ्या ‘हेरा फेरी’, ‘भागम भाग’, ‘दे दाना दान’, ‘वेलकम’ आणि आगामी ‘भूत बांगला’ आणि ‘हैवान’ या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो. आमच्या इंडस्ट्रीचे हे मोठे नुकसान आहे. ओम शांती.’

दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी लिहिले की, अंग्रेज के जमाने का जेलर आपल्यातून गेला! तुम्ही आम्हाला दिलेल्या चित्रपटांसाठी धन्यवाद ओम शांती. गीतकार मनोज मुंतशीर यांनी लिहिले की, इंग्रजांच्या काळातील जेलरने विनोदाचे एक युग मागे सोडले. असरानी साहेब, तुमची खूप आठवण येईल! देव तुम्हाला त्याच्या चरणी स्थान देवो! ओम शांती!

पत्रकार रजत शर्मा यांनी सोशल मीडियावर लिहिले की, लोकप्रिय विनोदी कलाकार असरानी यांचे निधन हे चित्रपटसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. त्यांची शोले मधील जेलरची भूमिका सर्वत्र गाजली. असरानी यांनी “मेरे अपने”, “बावर्ची”, “कोशिश” आणि “निकाह” यासह 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. या दुःखाच्या वेळी देव त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो.

असरानी य़ांची शेवटची पोस्ट

असरानी हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय होते. इन्स्टाग्रामवर ते त्यांचे जवळपास साडे सहा लाख फॉलोअर्स होते. सुरुवातीच्या काळात साकारलेल्या भूमिकांचे काही व्हिडीओ ते आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर करायचे. निधन होण्याच्या काही तास अगोदरच असरानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली होती. सध्या दिपावलीचा उत्सव सुरू आहे. या उत्सवानिमित्त त्यांनी त्यांच्या सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच त्यांचे निधन झाले आहे.