प्रसिद्ध गायक आतिफ असलम अडचणीत; भारत सरकारचा मोठा निर्णय, या गोष्टीवर थेट बंदी घातली

एकीकडे भारतात पाकिस्तानी स्टार्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे, तर आता सरकारने पाकिस्तानचे प्रसिद्ध गायक आतिफ असलम यांच्या यूट्यूब अकाउंटवरही बंदी घातली आहे. हे पाऊल आतिफच्या भारतातील चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. याशिवाय, आतिफचे इन्स्टा अकाउंटही भारतात दिसत नाही.

प्रसिद्ध गायक आतिफ असलम अडचणीत; भारत सरकारचा मोठा निर्णय, या गोष्टीवर थेट बंदी घातली
Atif Aslam
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 02, 2025 | 9:00 PM

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश संतापला आहे. दहशतवाद्यांनी 26 ते 27 निष्पाप लोकांना ज्या क्रूरतेने लक्ष्य केलं ते खरोखरच सर्वांना हादरवून सोडणारं आहे. देशात सर्वत्र संतापाचे वातावरण असताना, लोक सरकारकडून पाकिस्तान आणि दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहेत. दरम्यान, सरकारने आणखी एक मोठी कारवाई केली आहे.

भारत सरकारच्या निर्णयाने आतिफ असलम अडचणीत 

एकीकडे भारतात पाकिस्तानी स्टार्सच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे, तर आता सरकारने पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक आतिफ असलम यांच्या यूट्यूब अकाउंटवरही बंदी घातली आहे. हे पाऊल आतिफच्या भारतातील चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. याशिवाय, आतिफचे इन्स्टा अकाउंटही भारतात दिसत नाही आहे. तसं पाहायला गेलं तर आतिफचा भारतात मोठा फॅन फॉलोईंग आहे. भारत सरकारच्या निर्णयाने त्याच्या अडचणीत नक्कीच वाढ होणार आहे.

दोन्ही देशांमधील तणाव

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील लोकांमध्ये खूप संताप आहे. त्याच वेळी, भारतात प्रसिद्ध असणारे पाकिस्तानी स्टार्स हानिया आमिर, माहिरा खान, सनम सईद, आयेजा खान, इकरा अजीज यांच्या कंटेंटवर भारत सरकारने थेट बंदी घातली आहे. आता त्यात आतिफचे नावही समाविष्ट झाले आहे. आतिफचे इंस्टाग्राम आणि यूट्यूब दोन्ही अकाउंट भारतात दिसत नाहीयेत.

आतिफने अनेक हिट्स दिले

आतिफ हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. त्याने अनेक उत्तम गाणी गायली आहेत. आतिफने 2002 मध्ये “जल” नावाच्या बँडसह आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर त्यांनी “आदत” आणि “वो लम्हे” सोबत अनेक हिट गाणी दिली. आतिफने भारतीय चित्रपटांमध्ये ‘तू जाने ना’, ‘बे इंतेहा’, ‘जीना-जीना’ सारखी अप्रतिम गाणी गायली आहेत.