AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda : अफेअरच्या चर्चेदरम्यान गोविंदा आणि कोमलचा रोमँटिक अंदाज, अभिनेत्याच्या मिठीत दिसली अभिनेत्री; फोटो व्हायरल

Govind Romantic Photo With Komal Rani : गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणीच्या अफेअरच्या चर्चा असून आता त्यांचे काही फोटो व्हायरल होतायत. या फोटोमध्ये गोविंद आणि कोमलचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. नेमकं कारण काय? जाणून घ्या.

Govinda : अफेअरच्या चर्चेदरम्यान गोविंदा आणि कोमलचा रोमँटिक अंदाज, अभिनेत्याच्या मिठीत दिसली अभिनेत्री; फोटो व्हायरल
| Updated on: Oct 02, 2026 | 6:57 PM
Share

बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. सध्या त्याचं नाव अभिनेत्री कोमल राणीसोबत जोडलं जात आहे. दोघं अनेक प्रसंगी एकत्र दिसले आहेत आणि त्यांच्या कथित अफेअरच्या चर्चाही झाल्या आहेत. तसंच गोविंदा आणि सुनीता एकमेकांना घटस्फोट देणार असल्याच्या चर्चाही झाल्या. डेटिंगच्या अफवांदरम्यान, आता ते एकमेकांच्या मिठीत दिसले आहेत. विशेष म्हणजे, गोविंदा आणि कोमल एका चित्रपटात एकत्र काम करत असून या सिनेमाची पहिली झलक प्रदर्शित झाली आहे.

काही दिवसांपूर्वी, गोविंदानं कोमल राणीसोबत एका पत्रकार परिषदेत बॉलिवूडमध्ये पुनरागमनाची घोषणा केली. त्यानं सांगितलं की, तो दोन चित्रपट घेऊन येत आहे, त्यापैकी एका सिनेमाचं नाव ‘रूपा’ आहे. हा एक स्त्री-केंद्रित चित्रपट असून गोविंदा कोमलच्या विरुद्ध भूमिकेत दिसणार आहे.

कोमल राणीची पोस्ट

कोमल राणीनं नुकतीच ‘रूपा’ चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक पोस्टर शेअर करत, हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली. पोस्टरमध्ये गोविंदा आणि कोमल राणी एका रोमँटिक पोजमध्ये दिसत आहेत. दुसऱ्या एका पोस्टमध्येही दोघं रोमँटिक पोजमध्ये दिसत आहेत. गोविंदानं कोमलला कमरेला धरलं आहे आणि दोघंही हसताना दिसत आहेत. गोविंदानं काळी पँट आणि पांढरा कोट घातला आहे, तर कोमलनं निळी साडी नेसली आहे.

गोविंदा ‘रूपा’चा दिग्दर्शक, निर्माता आणि लेखकही आहे

‘रूपा’मध्ये गोविंदा केवळ अभिनेत्री कोमल राणीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार नाही, तर त्याने एक मोठी जबाबदारीही स्वीकारली आहे. गोविंदा या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मितीही करत आहे. त्यानं चित्रपटाची कथाही लिहिली आहे.

गोविंदाचं ७ वर्षांनंतर पुनरागमन

दरम्यान, गोविंदा ७ वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होता. त्याचा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट, ‘रंगीला राजा’, सपशेल अपयशी ठरला होता. आता तो ‘रूपा’मधून दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा