
Govinda-Sunita Ahuja divorce: बॉलिवूडमध्ये प्रेम, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट गेल्या काही वर्षांपासून एक सामान्य गोष्ट झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमान यांना लग्नाच्या 29 वर्षांनंतर घटस्फोट होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता गोविंदा याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. गोविंदा आणि पत्नी सुनीता यांचा लग्नाच्या 37 वर्षांनंतर घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांवर खुद्द अभिनेत्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
रिपोर्टनुसार, गोविंदाला घटस्फोटाबद्दल विचारण्यात येताच अभिनेता म्हणाला, ‘सध्या व्यवसायाबद्दल बोलणं सुरु आहे. मी माझा सिनेमा तयार करण्याच्या प्रयत्नात आहे…’ असं म्हणत अभिनेत्याने घटस्फोटाबद्दल बोलणं टाळलं आहे. पण अभिनेत्याचा मॅनेजर शशी सिन्हा यांनी दोघांच्या गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
शशी सिन्हा म्हणाले, ‘कुटुंबातील काही सदस्यांच्या वक्तव्यांमुळे गोविंदा आणि सुनिता यांच्या नात्यात समस्या सुरू आहेत.. सध्या गोविंदा त्याच्या सिनेमामध्ये व्यस्त आहे. त्यांचा स्वतःचा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे ऑफिसमध्ये नवे कलाकार सतत ऑडिशनसाठी येत आहेत. सध्या ज्या चर्चा रंगल्या आहे, त्यावर पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत…’
रिपोर्टनुसार, गोविंदा याला घटस्फोट नको असून, पत्नी सुनीता हिला घटस्फोट हवा आहे. गोविंदा याला पत्नीसोबत असलेल्या नात्याला आणखी एक संधी द्यायची आहे… पण सुनीता यांचा यासाठी पूर्णपणे नकार आहे…. सध्या गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत सुनीता यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. ‘मी आणि गोविंदा एकत्र राहत नाही. मी माझ्या मुलांसोबत वेगळी राहते, तर गोविंदा वेगळ्या घरात राहतात…’ असं सुनीता म्हणाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, सुनिताने काही महिन्यांपूर्वी गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती.