Govinda Naam Mera Review: मर्डर मिस्ट्रीमध्ये मनोरंजनाचा तडका; जाणून घ्या कसा आहे विकी कौशलचा चित्रपट?

'गोविंदा नाम मेरा'ची हटके कथा; विकी-कियाराच्या केमिस्ट्रीची कमाल, वाचा संपूर्ण रिव्ह्यू..

Govinda Naam Mera Review: मर्डर मिस्ट्रीमध्ये मनोरंजनाचा तडका; जाणून घ्या कसा आहे विकी कौशलचा चित्रपट?
Govinda Naam Mera ReviewImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 11:42 AM

मुंबई: अभिनेता विकी कौशलचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा कॉमेडी चित्रपट हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. देशभक्तीच्या कथा आणि गंभीर भूमिका साकारून आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडणारा विकी या चित्रपटात हटके भूमिका साकारतोय. यामध्ये विकीसोबतच (गोविंदा) भूमी पेडणेकर (गौरी) आणि कियारा अडवाणी (सुकू) यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट कसा आहे, ते जाणून घेऊयात..

‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात एका कोरिओग्राफरची कथा दाखवण्यात आली आहे. ज्याच्यावर त्याच्याच पत्नीच्या (भूमी पेडणेकर) हत्येचा आरोप आहे. या गुन्ह्यात त्याची गर्लफ्रेंड (कियारा अडवाणी) साथ देते. संपत्ती आणि त्याच्याशी संबंधित कौटुंबिक वाद, पत्नी आणि गर्लफ्रेंडच्या मध्ये अडकलेला पती, आजारी आईची समस्या या सर्व गोष्टींदरम्यान प्रेक्षकांना मजेशीर कॉमेडीसुद्धा अनुभवायला मिळणार आहे.

चित्रपटाची कथा

गोविंदा वाघमारे हा एक बिचारा पती आहे, ज्याला त्याची पत्नी खूप ब्लॅकमेल करत असते. गोविंदाचा एक सावत्र भाऊ आहे, जो त्याचा घर आपल्या नावावर करू इच्छितो. गौरी वाघमारे ही तिच्या पतीच्या परिस्थितीचा फायदा उचलते. गोविंदाच्या आयुष्यात सुकूसुद्धा आहे, जी त्याची गर्लफ्रेंड आहे. सुकूला गोविंदाशी लग्न करायचं आहे, मात्र तो पत्नी आणि आजारी आईच्या समस्यांमध्ये अडकला आहे. मात्र या चित्रपटात ज्याप्रकारे भूमिका दाखवल्या आहेत, त्या तशा बिलकूल नाहीत. कथेदरम्यान यात अनेक रंजक खुलासे होतात.

हे सुद्धा वाचा

कसा आहे चित्रपट?

या चित्रपटात विकी कौशल आणि कियारा अडवाणीची केमिस्ट्री प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेते. रणबीर कपूरने यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. भूमी पेडणेकरने पुन्हा एकदा दमदार अभिनय केलं आहे. विकी कौशलच्या आईच्या भूमिकेत रेणुका शहाणे आणि वकील-मित्राच्या भूमिकेत अमेय वाघने उत्तम काम केलंय. दिग्दर्शक शशांक खैतानसुद्धा या चित्रपटात अभिनय करताना पहायला मिळतो.

‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’ या चित्रपटानंतर दिग्दर्शक शशांकने पुन्हा एकदा कमाल केली आहे. डायलॉग, गाणी आणि सिनेमॅटोग्राफी या चित्रपटाच्या जमेच्या बाजू ठरतात.

का पहावा हा चित्रपट?

मसाला एंटरटेन्मेंट चित्रपटाची प्रतीक्षा बॉलिवूडच्या चाहत्यांना नेहमीच असते. भरपूर कॉमेडी, गरजेनुसार रोमान्स, पुरेसा सस्पेन्स आणि ड्रामा या चित्रपटात असल्याने हा एक परफेक्ट एंटरटेन्मेंट पॅकेज ठरतो.

चित्रपटाचा कमकुवत भाग

गोविंदा नाम है मेरा या चित्रपटाची कथा अनेक ठिकाणी प्रेडिक्टेबल होऊन जाते. त्यामुळे यातील काही सीन्स रटाळवाणे आणि कंटाळवाणे वाटू शकतात.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.