गोविंदाचा मोठा खुलासा… विवाहित असताना प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात… म्हणाला, ‘बहुलीसारखी वाटायची आणि…’

विवाहित आणि दोन मुलांचा बाप असताना गोविंदा प्रसिद्ध अभिनेत्रीच्या होता प्रेमात, अखेर अनेक वर्षानंतर म्हणाला, 'ती मला बहुलीसारखी वाटायची आणि...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा...

गोविंदाचा मोठा खुलासा... विवाहित असताना प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात... म्हणाला, बहुलीसारखी वाटायची आणि...
अभिनेता गोविंदा
| Updated on: Mar 05, 2026 | 2:30 PM

अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदा याची पत्नी सुनीता अहुजा हिने अभिनेत्यावर गंभीर आरोप केलेले. आता गोविंदा याने 90 च्या दशकात एका अभिनेत्रीसोबत असलेल्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. 90 च्या दशकात गोविंदा याने एकापेक्षा एक सिनेमे देत चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत गोविंदा याने स्क्रिन शेअर केली आहे. बॉलिवूडमध्ये काम करत असताना अभिनेत्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत देखील जोडण्यात आलं… त्याच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री नीलम कोठारी…

आजही नीलम आणि गोविंदा यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. विवाहित असताना गोविंदा यांचं नाव नीलम हिच्यासोबत जोडलं जात होतं. आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, गोविंदा याने नीलम हिच्यासोबत असलेल्या तिच्या नावाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे…

नुकातच झालेल्या एका मुलाखतीत, गोविंदा याला निलम हिच्यासोबत रंगलेल्या अफेअरच्या चर्चांबद्दल विचारण्यात आलं… यावर गोविंदा म्हणाला, ‘आमच्यासारख्या गावतल्या मुलांना गोऱ्या मुली प्रचंड आवडतात… ते एक प्रकारचं आकर्षण असतं आणि के स्वाभाविक आहे… नीलम खूप वेगळी होती आणि ती खूप चांगली होती… तिला पाहिल्यानंतर असं वाटायचं की, एखाद्या बाहुलीसारखी आहे…’

 

 

पुढे गोविंदा म्हणाला, ‘मी नीलमे सिनेमे पाहायचो आणि तिला पाहिल्यानंतर शिट्ट्या वाजवायचो…. त्यावेळी असा विचार कधीच केला नव्हता की, एक दिवस नीलम हिच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल. त्यानंतर जेव्हा एकत्र काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा विश्वासच बसत नव्हता…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

गोविंदा पुढे म्हणाला, ‘तेव्हाचे अफेअर आजच्या अफेअर प्रमाणे नव्हते… आम्ही फक्त एकत्र मज्जा – मस्ती करायचो आणि असं वाटायचं की काही तरी सुरु आहे. तेव्हा रोमान्स फक्त डोळ्यांनी व्हायचा… पण आम्ही एकत्र देखील अनेकदा काम केलं आहे… आमचा प्रत्येक सिनेमा आणि गाणं हीट झालं…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

Follow Us