AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदाचं अफेअर सुरू.. ऐकताच भडकली सुनिता अहुजा; थेट होस्टवर फेकला..

अभिनेता गोविंदा गेल्या काही काळापासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. त्याची पत्नी सुनिता अहुजाने नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत हजेरी लावली. परंतु या पॉडकास्टमध्ये गोविंदाच्या अफेअरबद्दल विचारताच तिचा संताप अनावर झाला.

गोविंदाचं अफेअर सुरू.. ऐकताच भडकली सुनिता अहुजा; थेट होस्टवर फेकला..
Sunita Ahuja and GovindaImage Credit source: Instagram
| Updated on: May 06, 2026 | 12:51 PM
Share

नव्वदच्या दशकातील सुपरस्टार गोविंदा गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याचं म्हटलं जात होतं. इतकंच नव्हे तर एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्याही चर्चा होत्या. या सर्व विषयांवर सुनिता तिच्या युट्यूब चॅनलवरील व्लॉगमध्ये आणि विविध मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली. गोविंदाला माझ्यापासून कोणीच वेगळं करू शकत नाही, असं स्पष्ट उत्तर तिने अनेकदा दिलं. पण त्याचसोबत गोविंदासोबत काही मतभेद असल्याचेही तिने मान्य केले. अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जेव्हा सुनिताला पुन्हा एकदा गोविंदाच्या अफेअरबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा मात्र तिचा संताप अनावर झाला.

सुनिता अहुजाने अभिषेक व्यासच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिला गोविंदाच्या अफेअरबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ते ऐकताच सुनिताला प्रचंड राग आला आणि तिने थेट होस्टच्या तोंडावर स्क्रिप्ट फेकला. इथे फालतू गोष्टींवर चर्चा करण्यासाठी मला बोलवता, असं म्हणत ती तीव्र संताप व्यक्त करते. त्यानंतर सूत्रसंचालक स्वत:ला सावरून तिला म्हणतोस, “मॅम, प्रश्न तर विचारावे लागतीलच.” थोड्या वेळानंतर सुनिता शांत होते आणि पुढील प्रश्नांची उत्तरं देऊ लागते. गोविंदा आणि तुम्ही वेगळे राहता का, असं विचारलं असता सुनिता म्हणाली, “कोणाच्या बापाची लायकी नाही की ते मला आणि गोविंदाला विभक्त करतील.”

या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण देताना सुनिताने पुढे सांगितलं, “आमची दोन घरं आहेत. जेव्हा गोविंदा खासदार झाला होता, तेव्हा बरेच कार्यकर्ते आमच्या घरी येऊ लागले. आम्हाला घरात शॉर्ट्स घालून फिरायची सवय आहे. माझी मुलगी टीनासुद्धा घरात शॉर्ट्समध्येच असते. त्यामुळे घरी सतत येणाऱ्या पाहुण्यांमुळे अडचणी येत होत्या. त्यावर उपाय म्हणून मी गोविंदाला समोरच एक घर घ्यायला सांगितलं. मी फक्त एवढंच म्हणाले आणि माध्यमांनी ते प्रमाणाच्या बाहेर वाढवून चढवून सांगितलं. गोविंदा आणि सुनिता एकत्र राहत नाहीत, अशा बातम्या पसरू लागल्या. काही गोष्टी इतक्या प्रमाणाबाहेर वाढवतात की एखाद्याचा संसार मोडला नसतानाही ते मोडेल.”

गोविंदा बी.कॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत असताना त्याची भेट सुनिता अहुजाशी झाली होती. बॉलिवूड इंडस्ट्रीत सुपरस्टार बनण्याआधीच गोविंदाने सुनिताशी लग्न केलं होतं. 1986 मध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर चार वर्षांपर्यंत या दोघांनी त्यांच्या नात्याला सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. या दोघांना यशवर्धन आणि टीना ही दोन मुलं आहेत.

Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर