AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशा भोसले यांच्यानंतर इंडस्ट्रीतील आणखी एका दिग्गज व्यक्तीचं निधन

टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे बंधू दर्शन कुमार यांनी दिल्लीत शनिवारी अखेरचा श्वास घेतला. ते 70 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून दर्शन कुमार आजारी होते. अखेर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

आशा भोसले यांच्यानंतर इंडस्ट्रीतील आणखी एका दिग्गज व्यक्तीचं निधन
Darshan Kumar and Gulshan KumarImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 19, 2026 | 7:34 PM
Share

काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला. त्या दु:खातून इंडस्ट्री सावरत असतानाच आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे छोटे बंधू दर्शन कुमार यांचं निधन झालं आहे. 18 एप्रिल 2026 रोजी दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीवर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दर्शन कुमार हे प्रसिद्धीपासून दूरच राहणं पसंत करत. ते इंडस्ट्रीत अत्यंत दयाळू आणि उदार व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. दर्शन कुमार हे अत्यंत शांत स्वभावाचे होते. पडद्यामागील योगदानासाठी ते ओळखले जायचे. त्यांनी अनेक कलाकारांना पाठिंबा दिला होता.

गायक मिका सिंहने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित दर्शन कुमार यांच्या निधनाची माहिती दिली. ‘आताच ही हृदयद्रावक बातमी मिळाली की टी-सीरिजचे मालक दर्शन कुमारजी आपल्याला सोडून गेले आहेत. ते खरोखरच महान व्यक्ती होते आणि इतरांना मदत करण्यासाठी ते नेहमी पुढे सरसावत होते. त्यांनी असंख्य गायकांना संधी दिली, त्यांना पाठिंबा दिला. अनेक प्रतिभावंत कलाकार त्यांच्यामुळे पुढे आले. मातारानी त्यांच्या आत्म्याला शांती आणि मुक्ती देवो’, अशा शब्दांत मिका सिंहने भावना व्यक्त केल्या आहेत.

मिका सिंहची पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Mika Singh (@mikasingh)

1983 मध्ये गुलशन कुमार यांनी सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली होती. हीच कंपनी पुढे जाऊन टी-सीरिज म्हणून ओळखली जाऊ लागली. या कंपनीने भारतीय संगीत क्षेत्रात क्रांती घडवून आणली. परंतु 12 ऑगस्ट 1997 रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर कृष्ण कुमार आणि भूषण कुमार यांनी कंपनीची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली.

गुलशन कुमार हे टी-सीरिजचा चेहरा होते, तर कंपनीच्या पडद्यामागील सर्व जबाबदाऱ्या दर्शन कुमार सांभाळत होते. गेल्या काही काळापासून ते वृद्धापकाळाशी संबंधित आरोग्याच्या समस्यांशी झुंद देत होते. शनिवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दर्शन कुमार यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार होणार असल्याचं कळतंय. यावेळी कुटुंबीय, भूषण कुमार, तुलसी कुमार, खुशाली कुमार आणि दिव्या खोसला कुमार यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Follow Us
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप