
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी नताशा हिला घटस्फोट दिल्यानंतर हार्दिक याच्या आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एका ब्रिटीश महिला सिंगर सोबत हार्दिक रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सांगायचं झालं तर, हार्दिक पांड्या सध्या ग्रीसमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. याच दरम्यान, हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश सिंगर जास्मिन वालिया याच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.
सोशल मीडियावर हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश सिंगर जास्मिन वालिया यांचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटो पाहिल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सांगायचं झालं तर, हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश सिंगर जास्मिन वालिया यांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. जे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश सिंगर जास्मिन वालिया यांनी एकमेकांसोबत फोटो पोस्ट केलेले नाहीत. पण दोघांच्या फोटो आणि व्हिडीओ मागचं बॅकग्राउंड आणि लोकेशन सारखंच दिसत आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश सिंगर जास्मिन वालिया याच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे.
हार्दिक पांड्या याने नुकताच पत्नी नताशा हिला घटस्फोट देत नातं संपवलं आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये देखील हार्दिक याने विक्रम रचला पण तेव्हा देखील नताशा हिने नवऱ्याला शुभेच्छा दिल्या नाहीत. शिवाय हार्दिक भारतात आल्यानंतर एकट्या मुलाने त्याच स्वागत केलं. तेव्हा देखील नशाता – हार्दिक एकत्र नव्हते. म्हणून हार्दिक – नताशा यांच्या घटस्फोटाने जोर धरला. पण तेव्हा दोघांनी देखील अधिकृत घोषणा केली नव्हती.
जेव्हा नताशा हिने मुलासोबत देश सोडला आणि तिच्या मायदेशी गेली… तेव्हा दोघांनी देखील घटस्फोट झाल्याची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. हार्दिक आणि नताशा यांनी 18 जुलै रोजी पोस्ट करून घटस्फोटाची घोषणा केली होती. दोघेही परस्पर संमतीने वेगळे झाले आहेत. घटस्फोटानंतर नताशा मुलासोबत आनंदाने जगत आहे.