हार्दिक पांड्या म्हणाला, असे कोणी मिळाले ज्याच्यासोबत मी संपूर्ण आयुष्य आता…
हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. हार्दिक पांड्याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हार्दिक पांड्या याच्या आयुष्यात सध्या अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. हार्दिक पांड्याने त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट घेतलाय.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक सतत चर्चेत आहेत. रात्री दोघांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हैराण करणारी माहिती सांगितली. नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांनी घटस्फोट घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचे सांगितले जात होते. नताशा स्टॅनकोविक हिने हार्दिकचे घर सोडल्याचीही जोरदार चर्चा रंगताना दिसली. शेवटी सर्व चर्चांना पूर्णविराम देत यांनी नाते संपल्याचे सांगितले. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्याच्या अगोदर नताशा स्टॅनकोविक हिने भारत सोडला. हेच नाहीतर नताशा ही आपल्या लेकाला देखील घेऊन तिच्या मायदेशी परतलीये.
नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांनी अखेर घटस्फोट का घेतला, याबद्दल तसा खुलासा होऊ शकला नाहीये. मात्र, यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सांगितले की, नताशा स्टॅनकोविक ही हार्दिक पांड्यावर नाराज आहे. दोघांनाही यांच्यातील वाद मिटवायचा नव्हता. नेहमीच नताशा स्टॅनकोविक ही हार्दिकला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचत असत.
हार्दिक पांड्या याने काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तो नताशा हिच्याबद्दल खुलासे करताना दिसला. हार्दिक पांड्या म्हणाला की, एका पार्टीमध्ये रात्री 1 वाजता मी आणि नताशा हे एकमेकांना भेटलो. ज्यावेळी तिने मला बघितले, त्यावेळी मी गळ्यात मोठी चैन, हातात घड्याळ अशा अवस्थेत तिथे पोहोचलो होतो.
हार्दिक म्हणाला, नताशाला माहिती पण नव्हते मी कोण आहे आणि काय करतो. त्यानंतर आम्ही एकमेकांसोबत वेळ घालवला. मी नताशाच्या आणि माझ्या नात्याबद्दल माझ्या घरच्यांनाही सांगितले नव्हते. मी माझ्या भावाला दोन दिवस अगोदर सांगितले होते की, मला एक मुलगी आवडली आणि मला तिच्यासोबत आता आयुष्यभर राहायचे आहे.
माझ्या कुटुंबियांनी मला सांगितले होते की, तुला जे करायचे ते कर आणि त्यानंतर मी तिच्यासोबत 1 जानेवारी 2020 साखरपुडा केला. आता घटस्फोटानंतर हार्दिक याची ही मुलाखत चांगली चर्चेत आलीये. काही दिवसांपूर्वी नताशा ही तिच्या मित्रासोबत मुंबईतील बांद्रा येथे स्पॉट झाली होती, त्यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या.
