AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त एवढंच सांग की तू..; वर्ल्ड कप विजयानंतरच्या पहिल्या पोस्टवर हार्दिक पांड्याच्या पत्नीला थेट सवाल

क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. वर्ल्ड कपच्या विजयानंतर नताशाने हार्दिकसाठी एकही पोस्ट लिहिली नाही. त्यामुळे हार्दिकचे चाहते खूप नाराज झाले आहेत. आता नताशाच्या एका पोस्टवर त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे.

फक्त एवढंच सांग की तू..; वर्ल्ड कप विजयानंतरच्या पहिल्या पोस्टवर हार्दिक पांड्याच्या पत्नीला थेट सवाल
नताशा स्टँकोविक, हार्दिक पांड्याImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 02, 2024 | 9:48 AM
Share

भारताने बार्बाडोसमध्ये पार पडलेल्या T-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयात हार्दिक पांड्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मात्र वर्ल्ड कपच्या विजयानंतर हार्दिकसाठी त्याची पत्नी नताशा स्टँकोविकने सोशल मीडियावर एकही पोस्ट न लिहिल्याने चाहते नाराज झाले आहेत. इतकंच नव्हे तर नताशाने वर्ल्ड कपच्या विजयानंतर तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्टसुद्धा हार्दिकशी संबंधित नसल्यामुळे चाहते भडकले आहेत. या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये असंख्य नेटकऱ्यांनी तिला वैतागून घटस्फोटाबद्दल प्रश्न विचारला आहे. ‘फक्त इतकंच सांगून टाक की तू हार्दिकसोबत आहेस की नाही’, असा सवाल चाहत्यांनी केला आहे.

नताशाने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिचे फोटो पोस्ट केले आहेत. वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विजयानंतर तिची ही पहिलीच पोस्ट आहे. त्यामुळे त्याकडे सर्व नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलंय. नताशाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती तिचं आऊटफिट आणि तिची पर्स दाखवताना दिसतेय. ‘फिट चेक’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. त्यावर नेटकऱ्यांनी लाइक्सचा वर्षाव तर केलाच आहे, पण त्याचसोबत अनेकांनी तिला हार्दिकबद्दलच्या प्रश्नांचा भडीमार केला आहे. ‘हार्दिकने वर्ल्ड कप जिंकला, त्याच्यासाठी कौतुकाची पोस्ट कुठेय’, असा प्रश्न एकाने विचारला. तर ‘नताशा वहिनी, आता आम्ही आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. आम्हाला थेट सांगून टाका की तुम्ही हार्दिकसोबत आहात की नाही’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘वर्ल्ड कप मिळो ना मिळो पण अशी पत्नी कोणालाच मिळू नये’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by @natasastankovic__

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविक यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून आलबेल नसल्याच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र या चर्चांवर दोघांनीही अद्याप काहीच प्रतिक्रिया दिली नाही. हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या आणि वहिनी पंखुडी शर्मा पांड्या सोशल मीडियावर नताशाच्या पोस्टवर कमेंट्स करताना दिसत आहेत. तर नताशासुद्धा त्यांचे कमेंट्स लाइक करतेय. त्यामुळे हार्दिकच्या कुटुंबीयांसोबत तिचं नातं अजूनही चांगलंच असल्याचं समजतंय.

नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘पांड्या’ हे आडनाव आणि लग्नाचे फोटो काढून टाकल्याने घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र काही दिवसांनी हे फोटो पुन्हा तिच्या अकाऊंटवर पहायला मिळाले. वर्ल्ड कपच्या सामन्यानंतर हार्दिक मैदानावर बसून व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसला होता. त्याने पत्नी आणि मुलाला हा व्हिडीओ कॉल केल्याची चर्चा होती.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.