AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पांड्याची पत्नी परफेक्ट टायमिंग साधत म्हणाली, ‘लोकं काहीही बोलत सुटतात, पण…

Hardik Pandya - Natasa Stankovic: 'खरी परिस्थिती कोणाला माहिती नसते, लोकं फक्त काहीही बोलत सुटतात, पण...', हार्दिक पांड्या याच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, परफेक्ट टायमिंग साधत नताशाने केलं मोठं वक्तव्य..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या नात्याची चर्चा...

हार्दिक पांड्याची पत्नी परफेक्ट टायमिंग साधत म्हणाली, 'लोकं काहीही बोलत सुटतात, पण...
| Updated on: Jul 11, 2024 | 8:28 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे तुफन चर्चेत आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करून हार्दिक पांड्याने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. प्रोफेशनल आयुष्यात हार्दिक याने मोठं यश मिळवलं आहे. पण खासगी आयुष्यात मात्र हार्दिक मोठ्या संकटांचा सामना करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि पत्नी स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांनी देखील यावर मौन बाळगलं आहे. पण नताशा सोशल मीडियावर कायम काहीना काही तरी पोस्ट करताना दिसत आहे.

नताशा लाईमलाईट पासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असते. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करत असते. आता देखील नताशा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कायम दुसऱ्या आयुष्यावर जजमेंट करणाऱ्या लोकांसाठी नताशा हिने खास व्हिडीओ तयार केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Aks (@mera_aks2020)

व्हिडीओमध्ये नताशा म्हणते, ‘कॉफी पित होती तेव्हा माझ्या मनात एक विचार आला, की लोकं कसं लगेच कोणाबद्दल जजमेंटल होतात. आपल्या आजू-बाजूला काय सुरु आहे, या गोष्टीचा ती व्यक्ती फक्त अभिनय करत असते. जर कोणी आपल्याप्रमाणे वागत नसेल, तर लोकं न थांबता, न विचार करता काहीही बोलत सुटतात… त्या व्यक्तीच्या मनातील भावना आपण समजून घेतच नाही…’

‘त्यामुळे मला म्हणायचं आहे की, आपण थोडं कमी जजमेंटल असायला हवं.. संयम ठेवून समोरच्या व्यक्तीची परिस्थिती आणि त्याच्या मनातील भावना समजून घेण्याचा प्रयत्न करू…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र नताशा हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

कसं आहे हार्दिक पांड्या आणि नताशा यांचं नातं?

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यापासून सर्वत्र हार्दिक पांड्या याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण हार्दिक याच्या पत्नीने त्याला शुभेच्छा देखील दिल्या नाही. ज्यामुळे सोशल मीडियावर नताशा हिला ट्रोल करण्यात आलं. घटस्फोटाच्या चर्चा सुरु असल्यामुळे नताशा हिने पतीला शुभेच्छा दिल्या नाहीत का? अशी चर्चा देखील चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर सुरु आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?