
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते, ही-मॅन, सर्वा देखणार हिरो, अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे धर्मेंद्र. चित्रपटसृष्टीमधील त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये धर्मेंद्र यांनाही पद्म पुरस्कार जाहीर झाला. भारत सरकारने धर्मेंद्र यांना सन्मानित करण्याची घोषणा केल्यानंतर देओल कुटुंब अतिशय आनंदित झालं आहे. धर्मेंद्र यांची द्वितीय पत्नी आणि अभिनेत्रीहेमा मालिनी यांची पहिली प्रतिक्रिया यानंतर समोर आली आहे. त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर एक पोस्टही लिहीली आहे. या बातमीचा आपल्याला अभिमान वाटतो असं त्यांनी नमूद केलं. सोशल मीडियावर आपला अभिमान व्यक्त केला. तसेच धर्मेंद्र व हेमा मालिनी यांची पत्नी ईशा देओल देखील तिच्या वडिलांना मिळणाऱ्या या सन्मानामुळे खूप आनंदी आहे.
हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया चर्चेत
हेमा मालिनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर धर्मेंद्र यांच्या नावाने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचा एक फोटो शेअर केला असून, चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याच्या योगदानाबद्दल आणि भारत सरकारने त्यांना दिलेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘चित्रपट जगतात त्यांच्या महान योगदानाबद्दल सरकारने धर्मेंद्रजींना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले आहे हे जाणून मला खरोखर अभिमान वाटतो.’ असं हेमा मालिनी यांनी लिहीलं.
ईशा देओलची पोस्टही आली समोर
तर धर्मेंद्र यांची लाडकी लेक, अभिनेत्री ईशा देओल ही देखील वडिलांना मिळालेल्या या सन्मानामुळे भारावली. ती खूप खुश आहे. तिने तिच्या इन्स्टा हँडलवर खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या पोस्टमध्ये, ईशाने प्रथम तिच्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, तिने तिचा भाऊ सनीच्या ‘बॉर्डर 2’ चित्रपटाला सपोर्टही केला आणि तिचे वडील धर्मेंद्र यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला.
‘ प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आमच्या वडिलांना इतक्या मोठ्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले जात आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे’ असं तिने पोस्टमध्ये नमूद केलं. त्यापुढेच तिने सर्वांना तिचा भाऊ सनी देओल याचा बॉर्ड-2 हा चित्रपट पाहण्याचे आवाहनही केलं. ‘तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसोबत बॉर्डर 2 हा चित्रपट नक्की पहा. आम्ही काल रात्री चित्रपट पाहिला आणि सनी देओलने खूप छान काम केले आहे’ असंही तिने लिहीलं.
ईशा देओलने काल रात्री सनी देओल याच्या बॉर्डर 2 चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं. त्यावेळी तिने मोठ्या भावासोबत फोटोसाठी पोझही दिल्या. वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच ईशा आणि अहाना त्यांचा मोठा भाऊ, सनीसोबत दिसल्या. त्यांना एकत्र पाहून चाहते खूप आनंदी झाले.