AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी भावूक, चेहऱ्यावर दुःख, केलं मोठं वक्तव्य, Video चर्चेत

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे... अभिनेत्री हेमा मालिनी अद्यापही धक्क्यातून सारलेल्या नाहीत.. आता देखील दुःख केलं व्यक्त... व्हिडीओ सर्वत्र होतोय व्हायरल

धर्मेंद्र यांच्या आठवणीत हेमा मालिनी भावूक, चेहऱ्यावर दुःख, केलं मोठं वक्तव्य, Video चर्चेत
Hema Malini
| Updated on: May 01, 2026 | 9:22 AM
Share

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आज आपल्यात नसले तरी, त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांकडे आणि कुटुंबियांकडे शिल्लक आहे… पण कुटुंबिय आजही या मोठ्या धक्क्यातून सावरलेले नाही. अभिनेत्री हेमा मालिनी यांना आजही धर्मेंद्र यांची कमतरता भासते… त्या कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत जुन्या आठवणी ताज्या करत असातत. सध्या हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी दुःख व्यक्त करताना दिसत… आता धर्मेंद्र यांच्या शिवाय आयुष्य कसं असेल माहिती नाही… असं हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.

भावूक झाल्या हेमा मालिनी

एका कार्यक्रमात हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल आणि त्यांनी त्यांच्या नात्यांना कसं हाताळलं याबद्दल सांगितलं. पतीबद्दल बोलताना हेमा यांचा आवाज दाटून आला. त्यांनी आपल्या भावना लपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांच्या डोळ्यात पाणी आलं…

हेमा मालिनी म्हणाल्या, ‘धर्मेंद्र यांच्या आयुष्याचा प्रवास, उत्सुकता आणि समर्पण आणि प्रेक्षकांसाठी भरपूर प्रेमाने भरलेला होता… ते कायम म्हणायचे, सिनेमा मनापासून मनापर्यंत जाण्याचा मार्ग आहे… सिनेमात काम करण्यासाठी ते प्रचंड पॅशनेट होते… कॅमेऱ्यासमोर राहायला त्यांना प्रचंड आवडायचं. त्यांची जोडीदार असल्यामुळे मला माहिती आहे की, त्यांच्यामध्ये किती उत्साह होता.’

‘दमदार अभिनय आणि प्रत्येकासोबत चांगल्या व्यवहारामुळे लाखो लोकांच्या मनावर ते राज्य करत होते. एक अभिनेता, मित्र आणि वडील म्हणून त्यांनी कायम नव्या पिढीला प्रेरित केलं. ते महान होते… मी स्वतःला भाग्यशाली समजते, की त्यांच्यासोबत राहण्याची संधी मला मिळाली. आता मला त्यांची खूप आठवण येते… पण ते आता नाही. माहिती नाही, त्यांच्याशिवाय मी माझं आयुष्य कसं जगेल…’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.

सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना हेमा मालिनी भावूक झाल्या. याआधी देखील धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना हेमा मालिनी यांच्या डोळ्यात पाणी आलं. हेमा मालिनी कायम धर्मेंद्र आणि दोन मुलींसोबत फोटो पोस्ट करत असतात. धर्मेद्र यांच्या निधनाबद्दल सांगायचं झालं तर, 24 नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये कधीच न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...