धर्मेंद्र यांच्या शेवटच्या क्षणी कुटुंबियांनी हेमा मालिनी यांच्यासोबत काय केलं? ज्यामुळे भडकले लोक

Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून घरी नेण्यात आलं. तेव्हा धर्मेंद्र यांनी त्यांचे शेवटचे क्षण पहिली पत्नी प्रकाश कौर आणि मुलांसोबत घालवला... पण असं काय झालं ज्यामुळे चाहते भडकले.

धर्मेंद्र यांच्या शेवटच्या क्षणी कुटुंबियांनी हेमा मालिनी यांच्यासोबत काय केलं? ज्यामुळे भडकले लोक
Hema Malini
Updated on: Nov 26, 2025 | 3:35 PM

Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन 24 नोव्हेंबर रोजी झालं. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वांना धक्का बसला. धर्मेंद्र यांनी त्यांचे शेवटचे दिवस त्यांच्या मुंबईतील घरी घालवले. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्यातील गाढ प्रेमाबद्दल संपूर्ण बॉलिवूड आणि संपूर्ण देशाला माहिती आहे, पण जेव्हा धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी आणण्यात आलं तेव्हा प्रश्न पडला की हेमा मालिनी धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातील का?

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर धर्मेंद्र पहिली पत्नी प्रकाश कौर आणि त्यांच्या मुलांसोबत राहत होते. त्यांच्या घरी हेमा मालिनी, धर्मेंद्र यांना भेटायला जातील अशी चर्चा रंगली होती. कारण, दोघांच्या लग्नाला 45 वर्ष झाली होती आणि हेमा मालिनी कधीच धर्मेंद्र यांच्या मुख्य घरातील पायरी चढल्या नाहीत.

हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्या सोबत राहायचं होतं…

धर्मेंद्र यांच्या अंतिम निरोपाने संपूर्ण देश संतापला असताना, सोशल मीडियावर यासंबंधी अनेक बातम्या येत आहेत. असं म्हटलं जात आहे की हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांना भेटण्यापासून रोखण्यात आलं. धर्मेंद्र यांच्या शेवटच्या क्षणी हेमा मालिनी यांना त्यांच्या सोबत राहायचं होतं. पण तसं झालं नाही… असं देखील सांगण्यात येत आहे.

धर्मेंद्र हे इंडस्ट्रीतील एक दिग्गज स्टार होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणं आवश्यक होतं. पण त्यांच्यावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्यात आले… त्यांना रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत नेण्यात आलं आणि तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

देओल कुटुंबियांवर भडकले लोक…

कोणालाच नाही माहिती की, धर्मेंद्र यांचं निधन कधी झालं.. देओल कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल अधिकृत घोषणा देखील कधी केली नाही… अखेर देओल कुटुंबियांनी असं का केलं? चाहत्यांना धर्मेंद्र याचं शेवटचं दर्शन देखील करता आलं नाही… दरम्यान, ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचे चाहते असेही म्हणतात की त्यांना पत्नीचा दर्जा नाकारण्यात आला होता. देओल कुटुंबाने जे केलं ते पूर्णपणे चुकीचं होतं.