AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Death : कोणाला दोष देऊ त्यांना की नियतीला…, धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने असं वक्तव्य केलं तेव्हा…

Dharmendra Death : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. धर्मेंद्र यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे क्षण पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यासोबत घालावले... आता त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल देखील चर्चा सुरु आहे.

Dharmendra Death : कोणाला दोष देऊ त्यांना की नियतीला..., धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने असं वक्तव्य केलं तेव्हा...
Dharmendra
| Updated on: Nov 26, 2025 | 2:25 PM
Share

Dharmendra Death : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्या खासगी आयुष्याबद्दल कोणाला माहिती नाही असं कोणीच नाही. एक काळ असा होता जेव्हा धर्मेंद्र त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे सर्वत्र चर्चेत होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर धर्मेंद्र यांचा अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर जीव जडला. अशात हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला… पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता त्यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरा संसार थाटला… तेव्हा प्रकाश कौर यांना प्रचंड दुःख झालं असं…

प्रकाश कौर यांनी एका मुलाखती दरम्यान, मनातील खंत देखील बोलून दाखवली होती… ‘हेमा मालिनी यांच्या जागी मी असती, तर कधीच कोणाचं घर आणि संसार उद्ध्वस्त केला नसता…’ शिवाय नक्की कोणाला दोष देऊ.. असं म्हणत प्रकाश कौर म्हणालेल्या, ‘धर्मेंद्र माझ्या आयुष्यातील पहिले आणि शेवटचे पुरुष आहेत. ते माझ्या मुलांचे वडील आहेत. मी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करते. मी त्यांचा सन्मान देखील करते. जे झालं ते झालं मला नाही माहिती कोणाला दोष दोऊ. त्यांना की नियतीला…’

पुढे प्रकाश कौर म्हणाला, ‘ते माझ्यापासून वेगळे होऊ शकतात. पण मला माहिती आहे मला जेव्हा त्यांची गरज भासेल तेव्हा ते कायम माझ्यासोबत असतील… मी कधीच त्यांच्यावर अविश्वास दाखवला नाही…’ असं देखील प्रकाश कौर म्हणाल्या होत्या…

धर्मेंद्र यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 1954 मध्ये धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं होतं. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांना दोन मुलं आणि दोन मुली आहेत. धर्मेंद्र यांच्या दोन मुली कधीच लाईमलाईटमध्ये आल्या नाहीत. धर्मेंद्र यांनी मुलींना सिनेमांमध्ये काम करण्याची कधीच परवानगी दिली नाही.

हेमा  मालिनी आणि धर्मेंद्र

1980 मध्ये धर्मेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. पण जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा यांनी लग्न केलं तेव्हा अभिनेते विवाहित होते. हेमा मालिनी यांना कायम धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नीचा दर्जा मिळाला.  शिवाय लग्नाच्या 45 वर्षांनंतर देखील हेमा मालिनी कधीच धर्मेंद्र यांच्या मुख्य घराची पायरी चढल्या नाहीत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...