Happy New Year : हेमांगी कवीनं ‘अशा’ हटके स्टाइलमधून दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा, पाहा Video

Happy New Year : हेमांगी कवीनं 'अशा' हटके स्टाइलमधून दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा, पाहा Video
हेमांगी कवी

अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) नेहमीच आपल्या रोखठोक भूमिकेमुळे चर्चेत असते. सोशल मीडिया(Social Media)वरही ती सक्रिय असते. आता इन्स्टाग्राम(Instagram)वर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून पुन्हा एकदा ती चर्चेत आलीय.

प्रदीप गरड

|

Jan 01, 2022 | 2:11 PM

मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) नेहमीच आपल्या रोखठोक भूमिकेमुळे चर्चेत असते. सोशल मीडिया(Social Media)वरही ती सक्रिय असते. आता इन्स्टाग्राम(Instagram)वर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून पुन्हा एकदा ती चर्चेत आलीय. सध्या विविध सेलिब्रिटी आपापल्या सोशल अकाउंटवरून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतायत. त्यात हेमांगीनंदेखील नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात.

बोल्ड लूक इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ आणि फोटो तिनं पोस्ट केलाय. यात तिचा लूक बोल्ड दिसतोय. स्विमिंग पुलाजवळ तिनं हा व्हिडिओ घेतला असून आपल्या चाहत्यांना तिनं नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कॅप्शनमध्ये हॅपी न्यू इअर 2022, वेलकम 2022 असं लिहून तिनं सर्वांना शुभेच्छा पाठवल्यात. तर व्हिडिओ क्रेडिट देताना लिहिलंय, ofcourse… Aur kaun bhai!

नुकताच झालाय लग्नाचा वाढदिवस हेमांगी कवी आणि संदीप धुमाळ यांच्या लग्नाचा वाढदिवस नुकताच झाला. यावेळी तिनं पतीला उद्देशून एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! या वर्षांपासून आपल्या लग्नाला किती वर्षे झाली बोलून वर्ष मोजायची नाहीत तर प्रत्येक क्षण जगायचा! एकमेकांना सहन करत आलो वगैरे तर मुळीच म्हणणार नाही कारण आपल्याला माहितेय आपण कसे आहोत आणि काय आहोत एकमेकांसाठी आणि हे माहीत असणंच जास्त महत्त्वाचं आहे. तसंच एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत आता… एकमेकांना सोडू शकत नाही दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! भांडत राहू, वाईट परिस्थितीशी झगडत राहू, आनंदी राहू, समाधानी राहू!, असं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

Brahmastra : रणबीर कपूरनं सर्वांसमोर आलिया भट्टला म्हटलं बॉम्ब! नेमकं काय झालं? पाहा Video

Malaika Arora : कोविडमुळे एकमेकांपासून दूर, मलायकानं अर्जुनला नववर्षाच्या दिल्या खास शुभेच्छा

Most Awaited Web Series : 2022मध्ये ‘या’ वेबसिरीज आणि चित्रपट OTTवर होणार प्रदर्शित.. इथे पाहा पूर्ण यादी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें