AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Malaika Arora : कोविडमुळे एकमेकांपासून दूर, मलायकानं अर्जुनला नववर्षाच्या दिल्या खास शुभेच्छा

मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) बॉलिवूड(Bollywood)मधल्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मलायकानं इन्स्टाग्राम(Instagram)वर अर्जुन कपूरसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

Malaika Arora : कोविडमुळे एकमेकांपासून दूर, मलायकानं अर्जुनला नववर्षाच्या दिल्या खास शुभेच्छा
अर्जुन कपूरसोबत मलायका अरोरा
| Edited By: | Updated on: Jan 01, 2022 | 12:36 PM
Share

मुंबई : मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) बॉलिवूड(Bollywood)मधल्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान, अर्जुन कपूरला पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली असून त्यानं स्वत:ला क्वारंटाइन केलंय. त्यामुळे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर तो मलायका अरोराला भेटू शकला नाही. अशा परिस्थितीत मलायका अरोराला अर्जुन कपूरची आठवण येतेय.

मालदीवचा फोटो शेअर मलायकानं इन्स्टाग्राम(Instagram)वर अर्जुन कपूरसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. तो सध्या प्रचंड व्हायरल होतोय. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘मी तुला मिस करत आहे मिस्टर पाउटी. नवीन वर्षाच्या शुभेच्छा.’ यासोबतच तिनं हार्ट इमोजीही पोस्ट केलीय. फोटोमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दिसत आहेत. खरंतर, हा फोटो अर्जुन कपूर आणि मलायकाच्या मालदीव व्हेकेशनचा आहे. तिथं दोघांनी एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला.

काही दिवसांपूर्वीच झाली कोविडची लागण काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरसह अंशुला, रिया कपूर आणि तिचा पती करण बुलानी यांना कोरोनाची लागण झाली. सध्या सर्वजण क्वारंटाइन असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. अर्जुन कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मलायका अरोराची कोविड चाचणीही करण्यात आली होती, मात्र ती निगेटिव्ह आली होती.

वर्कफ्रन्ट मलायका अरोरा सध्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर 2’ या रिअॅलिटी डान्स शोला जज करतेय. त्याच्यासोबत गीता कपूर आणि टॅरेन्स लुईसही या शोचे जज आहेत. अर्जुन कपूर ‘संदीप और पिंकी’ फरारमध्ये दिसला होता, त्यात त्यानं पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. या चित्रपटात परिणीती चोप्रानं मुख्य भूमिका साकारली होती. मात्र, या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

Bigg Boss 15 : सलमान खाननं उडवली अभिजित बिचकुलेची खिल्ली; म्हणाला, डान्सचा डी सुद्धा…

Most Awaited Web Series : 2022मध्ये ‘या’ वेबसिरीज आणि चित्रपट OTTवर होणार प्रदर्शित.. इथे पाहा पूर्ण यादी

Glimpse of LIGER | विजय देवरकोंडाचा जबरदस्त पंच..! लायगरचा टिझर टॉप ट्रेंडिंग..!

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.