Brahmastra : रणबीर कपूरनं सर्वांसमोर आलिया भट्टला म्हटलं बॉम्ब! नेमकं काय झालं? पाहा Video

Brahmastra : रणबीर कपूरनं सर्वांसमोर आलिया भट्टला म्हटलं बॉम्ब! नेमकं काय झालं? पाहा Video
Alia-Ranbir

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघांचा 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. या जोडप्याचा एक व्हिडिओ (Video) समोर आलाय.

प्रदीप गरड

|

Jan 01, 2022 | 1:29 PM

मुंबई : 2022 हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप खास आहे. कारण पॉवर कपल रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. दोघांचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर दोघांच्या लग्नाबाबतही अटकळ बांधली जातेय. दरम्यान, या जोडप्याचा एक व्हिडिओ (Video) समोर आलाय. यात रणबीर आलियाला काय म्हणालाय, ऐका…

‘रणबीर सुपरपॉवर’ नुकतेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट रिअॅलिटी टीव्ही शो ‘बिग बॉस सीझन 5’ (तेलुगू)च्या फिनाले एपिसोडमध्ये पोहोचले. याची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. इथं आलियानं तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरच्या सुपर पॉवरबद्दल सांगितलं. शांत स्वभाव हा तिचा प्रियकर रणबीरची सुपर पॉवर असल्याचं अभिनेत्री या व्हिडिओमध्ये सांगतेय.

चाहत्यांच्या कमेंट्स काही वेळातच रणबीर कपूरही त्याची गर्लफ्रेंड आलियाबद्दल बोलू लागतो. तो म्हणतो, की आलिया एक फटाका आहे, ती एक इकोफ्रेंडली फटाका आहे, ती लक्ष्मी बॉम्ब आहे, ती चकली, अनार आणि सर्वकाही आहे. ती नेहमी धमाके करते. हे ऐकून सगळे हसायला लागतात. आता हे ऐकून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत, कारण रणबीर खूप कमी बोलतो. लोक त्याच्या या व्हिडिओवर कमेंट्सही लव्ह इमोजीद्वारे करत आहेत.

आलिया-रणबीरच्या फॅन पेजवर क्लिप शेअर या शोच्या फिनाले एपिसोडची ही क्लिप आलिया-रणबीरच्या फॅन पेजवर शेअर केली जातेय. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. त्याच्यासोबत दिग्दर्शक एसएस राजामौलीही या शोमध्ये पाहुणे म्हणून पोहोचले होते. राजामौली यांनी आलिया भट्टचा चित्रपट RRR दिग्दर्शित केलाय.

पहिल्यांदाच एकत्र आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूरने सुपरहिरोची भूमिका साकारली असून अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय देखील यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा लोगो आणि मोशन पोस्टर रिलीज झाला असून आता चाहते त्याच्या ट्रेलरची वाट पाहत आहेत.

Photos : सोनम कपूरचं पती आनंद आहुजासोबत नवीन वर्षाचं रोमँटिक सेलिब्रेशन

Malaika Arora : कोविडमुळे एकमेकांपासून दूर, मलायकानं अर्जुनला नववर्षाच्या दिल्या खास शुभेच्छा

Bigg Boss 15 : सलमान खाननं उडवली अभिजित बिचकुलेची खिल्ली; म्हणाला, डान्सचा डी सुद्धा…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें