एक गाणं सुपरहिट ठरलं अन् त्याच नावाने सुरू झाला डान्स शो; आठवतंय का?

हिमेश रेशमियाचे हे गाणं प्रचंड गाजलं. हे केवळ सुपरहिट पार्टी अँथमच नव्हे, तर त्याच नावाचा लोकप्रिय सेलिब्रिटी डान्स टीव्ही शोही या गाण्याच्या नावाने आला. हिमेशने गायलेले व संगीतबद्ध केलेले हे गाणे बॉलिवूडमध्ये गाणे आणि टीव्ही शो अशा दोन्ही स्तरांवर अजरामर ठरलं.

एक गाणं सुपरहिट ठरलं अन् त्याच नावाने सुरू झाला डान्स शो; आठवतंय का?
सुपरहिट ठरलेल्या या गाण्याच्या नावारून आला प्रसिद्ध टीव्ही शो
| Updated on: Aug 20, 2026 | 2:45 PM

2000 च्या दशकाच्या सुरूवातील बॉलिवूड संगीताची एक वेगळीच क्रेझ होती. काही गाणी रिलीज होताच प्रेक्षकांच्या ओठांवर सहज रुळायची. अनेक पार्ट्यांमध्ये तीच गाणी पुन्हा पुन्हा वाजायची आणि डान्स फ्लोअरवरही त्याच गाण्यांच्या तालावर प्रत्येकाचं पाऊल थिरकायचं. हिमेश रेशमियाचंही असंच एक गाण होतं, ज्याची प्रचंड धूम होती. विशेष म्हणजे, हे गाणे केवळ सुपरहिट पार्टी नंबर ठरलं नाही, तर त्याच गाण्याच्या बोलांवरून एक प्रसिद्ध टीव्ही शोचंही नाव ठेवण्यात आलं. त्या शोमध्ये अनेक टीव्ही स्टार्स आणि सेलिब्रिटी हे आपल्या नृत्याच कौशल्य दाखवतानाही दिसले. आज आपण हिमेश रेशमियाच्या ज्या गाण्याबद्दल बोलतोय, ते गाणं म्हणजे ‘झलक दिखला जा’.. प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या गाण्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

‘अक्सर’ मधून गाजलं ‘झलक दिखला जा’

‘झलक दिखला जा’ हे 2006 साली प्रदर्शित झालेल्या ‘अक्सर’ चित्रपटातील गाणं आहे. हिमेश रेशमियाने या चित्रपटाची संगीत दिग्दरश्नचाी जबाबजारी तर सांभाळलीच पण या प्रसिद्ध गाण्यालाही त्यानेच आवाज दिला. या गाण्याचे बोल समीर यांनी लिहिले होते. ‘झलक दिखला जा’मध्ये अभिनेता इम्रान हाश्मी , डिनो मोरिया आणि उदिता गोस्वाी हे कलाकार होते. गाण्याचा ठेका, आकर्षक धून आणि सहज लक्षात राहणारा मुखडा यामुळे ते रिलीज होताच लोकप्रिय झाले. त्या काळातील पार्टी आणि डान्स नंबरमध्ये ‘झलक दिखला जा’ने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हिमेश रेशमियाच्या बहुचर्चित गाण्यांपैकी हे एक गाणं ठरलं.

गाण्याच्या नावाने सुरू झाला सेलिब्रिटी डान्स शो

मात्र या गाण्याची लोकप्रियता एवढ्यावरच थांबली नाही. काही काळानंतर ‘झलक दिखला जा’ याच नावाने टेलिव्हिजनवर एक सेलिब्रिटी डान्स शो सुरू झाला. या कार्यक्रमात बॉलिवूड आणि टीव्ही क्षेत्रातील कलाकार हे व्यावसायिक डान्सर्ससोबत जोडी बनवून विविध नृत्यप्रकार सादर करताना दिसले होते. प्रत्येक आठवड्याला कलाकारांच्या परफॉर्मन्सची स्पर्धा रंगायची. परीक्षकांनी दिलेले गुण आणि प्रेक्षकांनी केलेलं मतदान यावर स्पर्धकांचा पुढचा प्रवास ठरायचा. त्यामुळे हिमेश रेशमियाचं प्रचंड गाजलेलं हे गाणं, पुढे एका डान्स शोची देखील ओळख बनलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us