हिना खानची पहिल्याच कीमोथेरेपीमुळे झाली अशी हालत, पाहून चाहत्यांना बसला धक्का

अभिनेत्री हिना खान ही सध्या ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिला स्तनाचा कर्करोग असल्याचं जाहीर केलं होत. सोशल मीडियातून तिला भक्कम पाठिंबा मिळत आहे. नुकतीच तिची पहिली केमोथेरीपी झाली आहे. ज्यानंतर तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

हिना खानची पहिल्याच कीमोथेरेपीमुळे झाली अशी हालत, पाहून चाहत्यांना बसला धक्का
| Updated on: Jul 06, 2024 | 4:58 PM

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ टीव्ही मालिकेत अक्षराची भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकणारी हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे. ती तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी तिला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं समोर आले आहे. ती स्तनाच्या कर्करोगाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. कॅन्सरवर ती उपचार देखील घेत आहे. कॅन्सर झाल्यानंतर अनेक लोकं खचून जातात. अशा वेळी आशा आणि धैर्याने पुढे जावे लागते. तेच हिना खान देखील करताना दिसत आहे. तिचे चाहते ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने केमोथेरपीमुळे तिच्या शरीरावर झालेल्या खुणा तिने दाखवल्या आहेत.

हिना खानने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये विचारले, ‘तुन्हाला या फोटोत काय दिसतेय? माझ्या अंगावरचे चट्टे की डोळ्यात आशा? आशा माझ्या डोळ्यात आहे, माझ्या आत्म्याची सावली आहे. मी माझ्या बरे झालेल्या जखमा दाखवत आहे.

हिना खानच्या या पोस्टवर मिका सिंगने लिहिले की, ‘तू सिंहिणी आहेस आणि इंशाअल्लाह सर्वकाही ठीक होईल. लवकर बरी हो, माझ्या प्रार्थना तुझ्या पाठीशी आहेत. याशिवाय जुही परमार, मोना सिंग, मसाबा गुप्ता, दलजीत कौर, मोनालिसा, अर्जुन बिजलानी, लता सबरवाल, आरती सिंग, पार्थ समथान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि चाहते त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

अभिनेत्रीने कामातून ब्रेक घेतला आहे आणि तिच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करत आहे. हिना खानने जशी तिच्या आजाराची माहिती सोशल मीडियावर शेअर केली, त्याचप्रमाणे ती तिच्या उपचाराबाबतचे अपडेट्सही तिच्या चाहत्यांशी शेअर करत आहे. तिची पहिली केमोथेरपी असो किंवा तिचे केस कापणे असो, हिनाच्या पोस्ट्स पाहून ती याला हिमंतीने तोंड देत असल्याचं सिद्ध करत आहे.
6 जुलै 2024 रोजी हिना खानने तिचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. काही ठिकाणी ती मिरर सेल्फी घेत आहे तर काही ठिकाणी ती सेल्फी घेत आहे. हिनाने गुलाबी टँक टॉप आणि शॉर्ट्ससह नो-मेकअपमध्ये पोज देत आहे.