‘व्हिला व्हिएना’ ते ‘मन्नत’.. शाहरुख खानच्या बंगल्याचा इतिहास जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला हा असंख्य चाहत्यांसाठी जणू सेल्फी पॉईंटचं ठिकाण बनलं आहे. या बंगल्याचं जुनं नाव, तो शाहरुखने कसा विकत घेतला, त्याआधी तो कोणाच्या मालकीचा होता.. याविषयी सविस्तर जाणून घेऊयात..

बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांची आलिशान घरं.. हा चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय असतो. मुंबईत अनेक सेलिब्रिटींची घरं, बंगले आहेत, जी चाहत्यांसाठी पर्यटन स्थळापेक्षा किंवा सेल्फी पॉईंटपेक्षा कमी नाहीत. असाच एक बंगला म्हणजे ‘मन्नत’. बॉलिवूडच्या ‘किंग’ला शोभावं असं हे आलिशान, सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण घर. अभिनेता शाहरुख खानचा ‘मन्नत’ बंगला सध्या चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे तो आणि त्याचं कुटुंब वांद्रेच्या पाली हिल इथल्या तात्पुरत्या निवासस्थानी स्थलांतरित होत आहे. त्याचं घर आणि ग्रेड 2-बी स्ट्रक्चरमधील हेरिटेज इमारत ‘मन्नत’च्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. शाहरुख आणि त्याची इंटेरिअर डिझायनर पत्नी गौरी खान यांनी ‘मन्नत’चे दोन मजले वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या इमारतीचा बिल्ट अप एरिया आता 616.02 चौरस मीटरने वाढला आहे. नूतनीकरणानंतर ‘मन्नत’ कसा दिसेल, हे पाहण्याची अनेकांना उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर ‘मन्नत’च्या इतिहासाबद्दल जाणून घेऊयात.. ...