‘नाळ 2’मधील ‘मणी’च्या भूमिकेसाठी भार्गवची निवड कशी झाली? वाचा रंजक किस्सा

झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मिती ‘नाळ : भाग 2’ हा चित्रपट अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर 10 नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाणी, ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘नाळ’ हा चित्रपट सुपरहिट ठरला.

'नाळ 2'मधील 'मणी'च्या भूमिकेसाठी भार्गवची निवड कशी झाली? वाचा रंजक किस्सा
Bhargav Jagtap in Naal 2Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 3:25 PM

मुंबई : 14 नोव्हेंबर 2023 | दिवाळीच्या मुहूर्तावर नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच यातील कलाकारांचंही प्रचंड कौतुक होत आहे. चैतू, चिमी आणि त्यांच्या साथीला असणाऱ्या ‘मणी’च्या अभिनयालाही विशेष दाद मिळत आहे. चित्रपटातील ‘मणी’ची भूमिका भार्गव जगतापने साकारली आहे. चित्रपटसृष्टीची पार्श्वभूमी लाभलेल्या भार्गवची ‘नाळ भाग 2’साठी अगदी योगायोगाने निवड झाली. भार्गवचे वडील रत्नकांत जगताप याच क्षेत्रात कार्यरत असून ते भार्गवसाठी कधीही शब्द टाकू शकत होते, परंतु त्यांनी आधी शिक्षणाला प्राधान्य दिलं. एकदा एका चित्रपटाच्या प्रिमिअरला रत्नकांत जगताप भार्गवला घेऊन गेले होते. त्यावेळी ‘नाळ भाग 2’च्या कास्टिंग डायरेक्टरच्या नजरेत भार्गव आला. त्याची निरागसता, ग्रामीण व्यक्तिमत्व त्यांना भावलं आणि ‘मणी’ची भूमिका साकारण्याबाबत विचारणा केली. इतक्या मोठ्या प्रोजेक्टसाठी विचारणा झाली म्हटल्यावर रत्नकांत जगताप यांनी होकार दिला.

या भूमिकेसाठी भार्गवचं ऑडिशनसुद्धा झालं. 14 दिवसांच्या वर्कशॉपनंतर ‘नाळ भाग 2’च्या तीन महत्वाच्या पात्रांमध्ये त्याची निवड झाली. ध्यानीमनी नसताना अशी संधी यावी, ही भार्गव आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. शहरी वातावरणात वावरलेल्या भार्गवने अवघ्या 14 दिवसांमध्ये ग्रामीण जीवन, तिथलं भावविश्व, तिथलं बालपण हे सगळं आत्मसात केलं आणि अनुभवलंही. नागराज मंजुळे हे नेहमीच त्यांच्या चित्रपटांमध्ये नवोदितांना संधी देतात आणि त्यांची ही निवड नेहमीच योग्य ठरते. भार्गवच्या बाबतीतही तेच घडलं. ‘नाळ भाग 2’च्या निमित्ताने भार्गवची नाळ चित्रपटसृष्टीशी जोडली गेली.

हे सुद्धा वाचा

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘नाळ भाग 2’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.