AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉसच्या घराची रचना दरवर्षी बदलते; ते बांधण्यासाठी किती खर्च येतो? किंमत जाणून धक्का बसेल

बिग बॉस 19 सीझन आता चांगलाच चर्चेत आहे. स्पर्धकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी बिग बॉसचे घर ही एक फार रंजक गोष्ट असते. पण तुम्हाला माहितीये का की  प्रत्येक सीझनमध्ये थीमनुसार घर बनवण्यासाठी किती खर्च येतो जाणून धक्का बसेल. 

बिग बॉसच्या घराची रचना दरवर्षी बदलते; ते बांधण्यासाठी किती खर्च येतो? किंमत जाणून धक्का बसेल
Bigg Boss houseImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2025 | 7:15 PM
Share

बिग बॉस 19 सीझन आता चांगलाच चर्चेत आहे. स्पर्धकांचे वाद ते खेळातील ट्वीस्ट यामुळे शो पाहणे प्रेक्षकांसाठी जास्तच रंजक आहे. पण एक गोष्ट आहे की दरवर्षी बिग बॉसच्या घराची रचना दरवर्षी बदलत असते. त्यांची थीम वेगवेगळी ठेवण्यात येते. पण तुम्हला माहितीये का की बिग बॉसचं घर बनवण्यासाठी दरवेळेस किती खर्च येतो.

प्रत्येक सीझनमध्ये घर बांधण्याचा खर्च किती येतो?

बिग बॉसच्या घराच्या प्रत्येक सीझनमध्ये हे घर बांधण्याचा खर्च जाहिर केला जात नाही, परंतु प्रत्येक सीझनमध्ये त्यासाठी मोठी रक्कम मोजली जाते. ज्याचा अंदाज कोट्यवधी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसच्या घराच्या पाडण्याचा आणि पुनर्बांधणीचा खर्च जवळपास 3 कोटी ते 3.5 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. हा खर्च केवळ बांधकामासाठी नाही. तर त्यात डिझाइन, सेटमधील बदल, सुरक्षा आणि शोसाठी आवश्यक असलेले सहाय्यक कर्मचारी यांचाही समावेश आहे. घर बांधण्यासाठी सुमारे 500 ते 600 कामगार सहा महिने काम करतात.

घरात थीमनुसार बदल केला जातो

घर बांधण्याचा खर्च दरवर्षी बदलतो कारण प्रत्येक हंगामात शोची थीम वेगळी असते. त्यानुसार त्याचे रुप बदलते म्हणजे घराचे रूपांतर त्याच्या थीमनुसार केले जाते. आर्ट डायरेक्टर्स आतील इंटीरियर्स डिजाइन करतात. ज्याच्या सुशोभीकरणासाठी खूप पैसे खर्च होतात.

सतत देखरेखीसाठी अनेक कॅमेरे बसवलेले असतात

घरात तंत्रज्ञान आणि सुरक्षितता ही एक मोठी समस्या आहे. सतत देखरेखीसाठी अनेक कॅमेरे बसवलेले असतात, ज्यामुळे कंटेंट चालवण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते.या घरासाठी मोठ्या प्रमाणात सहाय्यक कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. शेकडो कामगार बांधकामात सहभागी असतात, तर शो चालवण्यासाठी मोठ्या सहाय्यक कर्मचाऱ्यांची देखील आवश्यकता असते.

तब्बल एवढे कॅमेर लावलेले असतात 

लॉजिस्टिक्स आणि देखभालीसाठीही खूप खर्च येतो, ज्यामध्ये सेटची देखभाल आणि स्पर्धकांचे व्यवस्थापन यांचा समावेश असतो.एका वृत्तानुसार, बिग बॉसच्या घरात बसवलेले कॅमेरे भाड्याने घेतले जातात. बिग बॉस संपल्यानंतर, हे कॅमेरे सर्वात आधी काढून टाकले जातात. सुमारे 120 कॅमेरे भाड्याने घेतलेले असतात त्यांच्या किमती जास्त असल्याने ते काढून नीट ठेवले जातात आणि पुढील सीझनसाठी पुन्हा बसवले जातात.

स्वयंपाकघरातील वस्तूंचे काय केले जाते?

स्वयंपाकघरातील वस्तू गोदामात पाठवल्या जातात. यामध्ये रेफ्रिजरेटर, ओव्हन, आरओ मशीन, गॅस स्टोव्ह आणि भांडी यांचा समावेश आहे. गुणवत्ता आणि स्वच्छतेच्या कारणास्तव, या वस्तूंचा पुन्हा वापर केला जात नाही. सलमान खान ज्या टीव्हीवर स्पर्धकांशी संवाद साधतो तो टीव्ही देखील काढून गोदामात पाठवला जातो.

बिग बॉसचे बेड प्रत्येक हंगामात बदलले जातात. स्पर्धकांचे बेड प्रत्येक हंगामात बदलले जातात. कारागीर नवीन बेड बनवण्यासाठी सेटवर येतात. जुने बेड पुन्हा वापरले जात नाहीत. ते जास्त लक्झरी देत ​​नाहीत.

त्यामुळे बिग बॉसचे घरच नाही तर घरातील वस्तू ते स्वयंपाकघरातील किराणा इथपासून सगळी तयारी असते त्यामुळे निश्चितच याचा खर्च हा करोडोंमध्येच असतो. आणि दरवर्षी तो बदलतो.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.