Dharmendra : धर्मेंद्र यांची शेवटच्या क्षणी कशी होती अवस्था? ते हसले… हात जोडले आणि..

Dharmendra : 1 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं... त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील होत होती... पण नियतीच्या पुढे कोणाचं काहीही चालत नाही... असंच काही आता देखील झालं... जाणून घ्या शेवटच्या क्षणी धर्मेंद्र यांची प्रकृती कशी होती...

Dharmendra : धर्मेंद्र यांची शेवटच्या क्षणी कशी होती अवस्था? ते हसले... हात जोडले आणि..
Dharmendra
| Updated on: Nov 27, 2025 | 2:10 PM

Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना विसरणं फार कठीण आहे… आपल्या अभिनयातून चाहत्यांना पोट धरुन हसवणारे धर्मेंद्र चाहत्यांना रडवून गेले आहेत… 1 नोव्हेंबरपासून धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरु होते. पण प्रकृती गंभीर झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटी धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रुग्णालयात देखील पोहोचले होते… आता दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे… धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारेल असं सर्वांना वाटतं होतं…

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अनिल शर्मा म्हणाले, ‘मी धर्मेंद्र यांच्या घरी त्यांची विचारपूस करण्यासाठी गेलोलो… त्यांची प्रकृती सुधारत होती… मी गेल्यानंतर त्यांनी डोळे उघडले आणि हात देखील जोडले… डॉक्टरांनी देखील सांगितलं होतं की, धर्मेंद्र स्ट्राँग आहे…’

‘डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की धर्मेंद्र ठिक होतील… रुग्णालयात देखील वाटलं होतं ते ठिक होतील… पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात… 8 डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांचा वाढदिवस साजरा करू असं वाटत होतं…’ असं देखील अनिल शर्मा म्हणाले… धर्मेंद्र यांच्या मृत्यूनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

सांगायचं झालं तर, अनिल शर्मा यांनी धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं,,, धर्मेंद्र यांच्यासोबत त्यांनी हुकुमत, ऐलान ए जंग, फरिश्ते आणि तहलका सिनेमात काम केलं आहे… सांगायचं झालं तर, ‘अपने 2’ सिनेमा देखील चाहत्यांच्या भेटीस येणार होता. पण अनिल म्हणाले, ‘धर्मेंद्र यांच्याशिवाय सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही. सिनेमात धर्मेंद्र, सनी आणि बॉबी एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार होते…’

धर्मेंद्र यांना 1 नोव्हेंबर रोजी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची देखील माहिती समोर आली. एवढंच नाही तर, धर्मेंद्र यांचं निधन झालं… अशा देखील अफवा पसरल्या. पण अभिनेत्री हेमा मालिनी आणि ईशा देओल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारत आहे असं सांगितलं…

त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी डॉक्टरांनी धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देखील दिला. त्यानंतर जुहू येथील राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरु होते. कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्या वाढदिवासासाठी तयारी देखील सुरु केलेली.. 8 डिसेंबर रोजी धर्मेंद्र यांचा वाढदिवस होता… पण  24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला.