Hrithik Roshan: वयाच्या 49 व्या वर्षी हृतिक रोशन दुसऱ्या लग्नासाठी सज्ज? जाणून घ्या होणाऱ्या पत्नीबद्दल..

| Updated on: Jan 10, 2023 | 9:56 AM

17 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी हृतिक रोशन करणार लग्न? कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने दिली महत्त्वाची माहिती

Hrithik Roshan: वयाच्या 49 व्या वर्षी हृतिक रोशन दुसऱ्या लग्नासाठी सज्ज? जाणून घ्या होणाऱ्या पत्नीबद्दल..
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई: बॉलिवूडचा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशन त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्त त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत हृतिक दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याचं कळतंय. गेल्या काही महिन्यांपासून तो अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. हृतिक दुसऱ्या लग्नासाठी सज्ज झाला आहे. त्याचे कुटुंबीयसुद्धा त्याच्या या नात्याबद्दल खुश आहेत.

हृतिकच्या लग्नाच्या निर्णयाबद्दल त्याच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने सांगितलं, “दोघंही लग्नाचा विचार करत आहेत. काहीच घाई नाही. या वर्षाच्या अखेरपर्यंत गोष्टी सुरळीत होतील आणि लग्नाबद्दल विचार करतील. सध्या तरी हृतिक आणि सबा प्रोफेशनली कमिटेड आहेत.”

हे सुद्धा वाचा

हृतिक हे दुसरं लग्न अत्यंत साध्या पद्धतीने करणार असल्याचंही त्या व्यक्तीने स्पष्ट केलं. या लग्नात फक्त कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित असेल. हृतिकने 2000 मध्ये सुझान खानशी लग्न केलं. या दोघांना रेहान आणि हृदान ही दोन मुलं आहेत.

जवळपास 13 वर्षांच्या संसारानंतर 2013 मध्ये हृतिक आणि सुझानने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता हृतिक सबाला डेट करत आहे, तर सुझान ही अभिनेता अर्सलान गोणीला डेट करतेय. अर्सलान हा बिग बॉस फेम अली गोणीचा भाऊ आहे.

हृतिक आणि सबाच्या वयात जवळपास 17 वर्षांचं अंतर आहे. वयातील अंतरामुळे अनेकदा या दोघांना ट्रोल करण्यात आलं. ‘ही हृतिकची गर्लफ्रेंड आहे की मुलगी’, असाही उपरोधिक प्रश्न युजर्सनी केला. तर हिच्यापेक्षा कंगना बरी होती, असंही काहींनी म्हटलं. हृतिक आणि अभिनेत्री कंगना रनौत एकमेकांना डेट केल्याच्या चर्चा होत्या. या दोघांमधील वाद सर्वश्रुत आहे.

कोण आहे सबा आझाद?

सबा आझादचं खरं नाव सबा सिंग गरेवाल आहे. भारतातील प्रसिद्ध नाट्य कलाकार आणि कम्युनिस्ट नाटककार सफदर हाश्मी यांची ती भाची आहे. सबाने तिच्या दिवंगत काकाच्या दिल्लीतील जन नाट्यमंच या थिएटर ग्रुपमधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे तिने हबीब तन्वीर आणि एम.के. रैना यांच्यासोबत काम केलं. इशान नायर दिग्दर्शित ‘गुरूर’ हा तिचा पहिला चित्रपट होता.