AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hrithik Saba | ‘हिने 16 ऐवजी 108 सोमवारचे उपवास केले असतील’; हृतिक-सबाच्या जोडीवर भन्नाट कमेंट्स

हृतिक आणि सुझान खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेल्याचं पहायला मिळतंय. हृतिक सबाला डेट करत असतानाच सुझान ही अर्सलान गोणीला डेट करतेय. हृतिक आणि सुझानला हृदान आणि रेहान ही दोन मुलं आहेत.

Hrithik Saba | 'हिने 16 ऐवजी 108 सोमवारचे उपवास केले असतील'; हृतिक-सबाच्या जोडीवर भन्नाट कमेंट्स
Hrithik Roshan and Saba Azad Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 12, 2023 | 11:26 AM
Share

मुंबई : चित्रपट निर्माते मधू मंटेना यांनी नुकतीच इरा त्रिवेदीशी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्यानंतर आयोजित केलेल्या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडमधील बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते. मात्र या रिसेप्शन पार्टीत अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझादने सर्वांचं लक्ष वेधलं. बॉलिवूडमधल्या या बहुचर्चित जोडीने रिसेप्शन पार्टीला एकत्र एण्ट्री केली आणि सर्वजण दोघांना पाहतच राहिले. हृतिक आणि सबा यांच्यातील रोमँटिक केमिस्ट्री सहज पहायला मिळत होती. पापाराझींनीही दोघांचे फोटो क्लिक करताना ‘परफेक्ट जोडी’ म्हणत प्रशंसा केली. हृतिक आणि सबाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. हे दोघं गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. याआधी हृतिक आणि सबाला प्रचंड ट्रोल केलं गेलं. मात्र पहिल्यांदाच नेटकरी या जोडीचं कौतुक करत आहेत.

या रिसेप्शन पार्टीला हृतिकने व्हाइट अँड ब्लॅक सूट परिधान केला होता. तर सबा पूर्णपणे पारंपरिक अंदाजात पहायला मिळाली. तिने पंजाबी सूट आणि लांब वेणी असा लूक केला होता. पार्टीमध्ये जाण्यापूर्वी दोघांनी पापाराझींना फोटोसाठी पोझ दिले. मात्र पोझ देण्यापूर्वी हे दोघं एकमेकांशी गप्पा मारताना दिसते. या दोघांमधील केमिस्ट्रीने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. त्यावरूनच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पहा व्हिडीओ

‘हृतिकसाठी हिने 16 नाही तर 108 सोमवारचे उपवास केले असणार’, असं एकाने लिहिलं. तर ‘पहिल्यांदा मला ही जोडी आवडली आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘हृतिक ज्याप्रकारे तिच्याकडे पाहत आहे, त्यावरून दोघं एकमेकांच्या किती प्रेमात आहेत हे स्पष्ट दिसतंय’ असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

हृतिक आणि सुझान खान यांचा घटस्फोट झाल्यानंतर दोघंही आपापल्या आयुष्यात पुढे गेल्याचं पहायला मिळतंय. हृतिक सबाला डेट करत असतानाच सुझान ही अर्सलान गोणीला डेट करतेय. हृतिक आणि सुझानला हृदान आणि रेहान ही दोन मुलं आहेत. विशेष म्हणजे सबा आणि सुझान यांच्याचही चांगली मैत्री झाली आहे.

हृतिक आणि सबाच्या वयात जवळपास 17 वर्षांचं अंतर आहे. हृतिकच्या कुटुंबीयांशीही सबाची जवळीक वाढली आहे. त्याच्या कुटुंबीयांसोबत मिळून तिने जेवण केलं होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हृतिक आणि सबाची पहिल्यांदा ओळख ही ट्विटरवर झाल्याचं म्हटलं जातं. हृतिकने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये सबा एका रॅपरसोबत दिसत होती. त्यानंतर सबाने हृतिकचे आभार मानले आणि दोघांचा संवाद सुरू झाला.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल