‘अभिमान वाटावा अशी आई…’ , हृतिक रोशनच्या पहिल्या पत्नीने लेकाचा ‘हा’ व्हिडीओ केला पोस्ट

Hrithik Roshan Son | मुलाला असं पाहिल्यानंतर हृतिक रोशन याची पहिली पत्नी भावूक, सोशल मीडियावर लेकाचा खास व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली..., सोशल मीडियावर हृतिक आणि सुझान यांच्या मोठ्या लेकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल...

अभिमान वाटावा अशी आई... , हृतिक रोशनच्या पहिल्या पत्नीने लेकाचा हा व्हिडीओ केला पोस्ट
| Updated on: Mar 03, 2024 | 1:29 PM

मुंबई | 3 मार्च 2024 : अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी लग्नाच्या जवळपास 19 वर्षांनंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला. हृतिक आणि सुझान यांचे मार्ग वेगळे झाले असले तरी, मुलांसाठी दोघे अनेकदा एकत्र येताना दिसले. आता देखील सुझान – हृतिक मोठ्या मुलामुळे चर्चेत आले आहे. सुझान हिने मोठया लेकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हृतिक – सुझान यांचा मुलगा ऋदान रोशन याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

ऋदान रोशन व्हिडीओमध्ये गिटार वाजवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ऋदान रोशन हॉलिवूड गायक ईडी शीरीन याचं हीट गाणं ‘ए टीम’ गाताना दिसत आहे. ऋदान रोशन याच्या आवाजाने गिटार वाजवण्याचा कौशल्याने चाहत्यांना आकर्षित केलं आहे. सुझान हिने पोस्ट केलेल्या ऋदान रोशन याच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

लेक ऋदान रोशन याचा व्हिडीओ पोस्ट करत सुझान हिने कॅप्शनमध्ये भावाना व्यक्त केल्या आहेत. सुझान म्हणाली, ‘माझा Ridzo… मी पाहू शकते की, तू किती दयाळू आहेस… मी तुझा आवाज समजू शकते माझ्या मुला… तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्यास ब्रह्मांड कायम तुला मार्गदर्शन करेल आणि तुझी रक्षा करेल. मला तुझ्यावर गर्व आहे. मला अभिमान वाटतो तू माझी आई म्हणून निवड केली…’

 

ऋदानच्या शिक्षकांसाठी सुझान म्हणाली, ‘धन्यवाद कुणाल सर… कायम त्याच्या (ऋदान) सोबत राहा आणि कायम त्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करत राहा…’ सांगायचं झालं तर, ऋदानच्या व्हिडीओवर सुझानचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनी यांने देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत ऋदानचं कौतुक केलं आहे.

सांगायचं झालं तर, हृतिक रोशन आणि सुझान खान यांना दोन मुलं आहे. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव ऋदान रोशन तर लहाण मुलाचं नाव रेहान असं आहे. हृतिक रोशन आणि सुझान खान यांचं घटस्फोट झालं असलं तरी, दोघे एकत्र मुलांचा सांभाळ करतात.

हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या घटस्फोटानंतर सुझान हिच्या आयुष्यात अभिनेता आणि मॉडेल अर्सलान गोनी याची एन्ट्री झाली तर, हृतिक याच्या आयुष्यात गायक आणि अभिनेत्री सबा आझाद हिची एन्ट्री झाली. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.