हिचं डोकं ठिकाणावर आहे का? पूर्व पत्नी सुझानकडून हृतिकला वाढदिवसाच्या अशा शुभेच्छा, नेटकरी अवाक्!

बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' अर्थात अभिनेता हृतिक रोशनने नुकताच आपला 52 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्याची पूर्व पत्नी सुझान खानने खास पोस्ट लिहिली आहे. परंतु या पोस्टमुळे आणि फोटोंमुळे सुझानलाच नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

हिचं डोकं ठिकाणावर आहे का? पूर्व पत्नी सुझानकडून हृतिकला वाढदिवसाच्या अशा शुभेच्छा, नेटकरी अवाक्!
हृतिक रोशन, सबा आझाद, सुझान खान आणि इतर
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 14, 2026 | 1:35 PM

अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या कुटुंबीयांसोबत मिळून 52 वा वाढिदवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्याची पूर्व पत्नी सुझान खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्यांच्या फॅमिली ट्रिपच्या सर्व आठवणी पहायला मिळत आहेत. हृतिक, सुझान, त्यांची दोन्ही मुलं, हृतिकची गर्लफ्रेंड सबा, सुझानचा बॉयफ्रेंड अर्सलान आणि इतर कुटुंबीय या फोटोंमध्ये दिसत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सुझानने हृतिकसाठी खास मेसेज लिहिला आहे. परंतु यावरून नेटकरी सुझानला प्रचंड ट्रोल करत आहेत. ‘हिचं डोकं ठिकाणावर आहे का’, असा सवाल नेटकरी करत आहेत. हृतिक आणि सुझान घटस्फोटानंतरही असं कसं राहू शकतात, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सुझानने तिच्या या पोस्टमध्ये फक्त हृतिकवरच नाही तर त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हिच्यावरही प्रेमाचा वर्षाव केला आहे. ‘..कारण तू नेहमीच आम्हा सर्वांसाठी तारांनी भरलेला आकाश असशील. वाढदिवसाच्या शुभेच्छा रे. तुला आणि सबुला आयुष्यातील सर्व चांगल्या गोष्टी, जीवनातील सर्व प्रेम आणि आशीर्वाद मिळोत. इथून पुढे आपण सर्वजण कुटुंब आणि हृदयाच्या बंधनांच्या पलीकडे जोडलेले राहुयात’, असं तिने लिहिलं आहे. घटस्फोटानंतर हृतिक-सुझान त्यांच्या आताच्या जोडीदारासोबत मिळून एकत्र फिरायला जात आहेत, पार्टी करत आहेत.. हे पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य वाटू लागलं आहे.

‘हे काय चाललंय? याला सामंजस्यपणा म्हणायचा की मूर्खपणा’, असं एकाने लिहिलंय. तर ‘घटस्फोटानंतर मुलांसाठी पती-पत्नी एकमेकांसोबत चांगले संबंध ठेवतात, हे मान्य आहे. पण पूर्व पत्नीसोबत आणि पूर्व पतीसोबत त्यांच्या सध्याच्या गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडला घेऊन ट्रिपला जाणं हे जरा विचित्र आणि समजण्यापलीकडचं आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘अजब प्रेम की गजब कहानी’ असा उपरोधिक टोला आणखी एका युजरने लगावला आहे.

हृतिक सध्या अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय. तर सुझान खान ही अर्सलान गोणीला डेट करतेय. घटस्फोटानंतर पूर्व पती किंवा पत्नीसोबतचं नातं चांगलं राहत नाही, असा अनेकांचा समज असतो. पण हृतिक आणि सुझानच्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. घटस्फोटानंतरही त्यांच्यात चांगली मैत्री आहे. इतकंच नव्हे तर या चौघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आहे. सबा आणि सुझान यांचंही एकमेकींसोबत चांगलं पटतं. तर हृतिक आणि अर्सलान यांनाही एकत्र पाहिलं गेलंय. बर्थडे पार्ट्यांनाही हे चौघं एकत्र येतात.