AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैफचा लेक इब्राहिम 24 व्या वर्षीच बनला ‘बाबा’; फोटो शेअर करत म्हणाला,”ही माझी मुलगी, आमचं मागच्या जन्माचं नातं…”

सैफ अली खानचा लेक इब्राहिम अली खान चक्क 24 व्या वर्षीच 'बाबा' बनला आहे. होय ही पोस्ट त्याने स्वत: त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याने काही फोटोही शेअर केले आहेत त्या फोटोवंर लिहिलेल्या कॅप्शनमध्ये 'ही माझी मुलगी' अशी ओळख करून दिली आहे.

सैफचा लेक इब्राहिम 24 व्या वर्षीच बनला 'बाबा'; फोटो शेअर करत म्हणाला,ही माझी मुलगी, आमचं मागच्या जन्माचं नातं...
ibrahim ali khanImage Credit source: Instagram
| Updated on: May 15, 2025 | 6:11 PM
Share

सैफ अली खानचा मुलगा आणि अभिनेता इब्राहिम अली खान नेहमीच चर्चेत असतो. ‘नादानियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा इब्राहिम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एका गोड बातमीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. खरंतर, इब्राहिम अली खानने अलीकडेच त्याच्या कुटुंबात एका खास सदस्याला आणलं आहे, ज्याबद्दल तो खूप भावनिकही होताना दिसत होता. या सदस्याचे नाव ‘बंबी खान’ आहे. आणि इब्राहिमने या बंबी खानसोबतचा फोटो त्याने शेअर करत त्याने चक्क त्याची मुलगी असल्याचंही त्याने म्हटलं आहे. त्यामुळे आता तो चक्र 24 व्या वर्षीच बाबा झाला आहे.

कोण आहे ‘बंबी खान’?

इब्राहिमने नुकतेच त्याच्या इंस्टाग्रामवर बंबीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत आणि एक हृदयस्पर्शी संदेशही लिहिला आहे. या फोटोंमध्ये इब्राहिम आणि बंबी यांच्यातील ते प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे. तर ही बंबी म्हणजे कुत्र्याचं छोट पिल्लू आहे. हा सुंदर क्षण शेअर करताना, इब्राहिमने बंबी त्याच्या आयुष्यात कशी आली हे सांगितलं आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट शेअर केली आहे.

इब्राहिमने त्याचा आनंद त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला

इब्राहिमने पोस्ट करत लिहिले आहे की, “एका शूटिंग दरम्यान, मी सेटवर असताना, हे लहान पिल्लू माझ्याकडे आलं आणि माझ्या मांडीवर बसलं. यानंतर ती माझ्याशी खेळू लागली आणि माझ्याशी इतकी जोडली गेली जणू काही आमचं वर्षानुवर्षे जुने नाते आहे.” इब्राहिम म्हणाला की त्या क्षणापासून आतापर्यंत बंबीने त्याचे मन जिंकले आहे आणि आता ती त्याच्यासाठी फक्त एक कुत्री नाही तर त्याच्यासाठी ती त्याची मुलगी आहे.

View this post on Instagram

A post shared by Ibrahim Ali Khan (@iak)

तसेच त्याने पुढे सांगितले की, ” हे पिल्लू माझ्या मागे मागे माझ्या व्हॅनीटीपर्यंत आलं. तेव्हा तिथला केअरटेकर मल म्हणाला ही कधीच कोणासोबत असं वागत नाही. हे नॉर्मल नाहीये. तेव्हा माझ्या लक्षात आलं की काहितरी कारण असेल म्हणूनच तिने मला निवडलं. जसं की ती मागच्या जन्मी माझी मुलगी होती किंवा अजून कोणी…” असं म्हणत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

आई अमृता सिंग तयार नव्हत्या

इब्राहिमने असेही सांगितले की पाळीव प्राणी घरी आणण्याचा निर्णय सोपा नव्हता. विशेषतः जेव्हा कुटुंबात आधीच विरोध होता. त्याची आई अमृता सिंग यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. पण इब्राहिमने हार मानली नाही आणि बंबीला घरी आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. शेवटी, तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आणि बंबीला घरी घेऊनच गेला.तर अशा पद्धतीने एका नव्या सदस्याची त्याच्या आयुष्यात आणि त्यांच्या घरात एन्ट्री झाली आहे.

इब्राहिम अली खानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच काजोल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत ‘सरजमीन’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो करण जोहरच्या पुढील चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द इयर 3’ मध्ये शनाया कपूरसोबतही दिसणार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.