AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG NEWS | अखेर एका आरोपीची ओळख पटली, सलमानच्या घरावर कुणी गोळीबार केला?

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाची ओळख पाटली आहे. विशाल उर्फ कालू असं त्याचं नाव आहे. मुंबई पोलिसांना एका खबऱ्यानं याबाबत माहिती दिल्याचं सूत्रांकडून कळत आहे. सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबारचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलाय. या सीसीटीव्हीत लाल टी शर्ट घातलेला आरोपी हा विशाल उर्फ कालू असल्याची माहिती समोर येत आहे.

BIG NEWS | अखेर एका आरोपीची ओळख पटली, सलमानच्या घरावर कुणी गोळीबार केला?
सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाची ओळख पाटली आहे
| Edited By: | Updated on: Apr 14, 2024 | 9:05 PM
Share

अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरु आहे. या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांची मोठी यंत्रणा तपासाच्या कार्याला लागली आहे. या प्रकरणातील एका संशयित आरोपीची ओळख पटल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. गँगस्टर विशाल उर्फ कालू हा प्रमुख संशयित आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी रोहतकच्या गुरूग्राममधील एका स्क्रॅप डीलरवर अंधाधुंद फायरिंग केल्याचा आरोपी तो आहे. गोळीबार केल्यापासून विशाल फरार होता. विशाल हा गुरूग्रामचा रहिवाशी गँगस्टर रोहित गोदरासाठी काम करत असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानं मुंबईसह बॉलिवूडही हादरलंय. या घटनेवरुन विरोधक गृहखात्यावर निशाणा साधत आहेत आणि सत्ताधाऱ्यांनी याबाबत गंभीर दखल घेतलीय. सलमानची अतिरिक्त सुरक्षा दिली गेल्याचं म्हटलंय. मात्र सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे कोण होते? त्यांचा हेतू काय होता? यावरुन विविध चर्चा झडतायत. आम्ही सलमानला जीवे मारु शकतो, असा संदेश यातून द्यायचा होता? की मग आमच्या बंदुकीची गोळी सलमानच्या घरापर्यंत जावू शकते, हे हल्लेखोराला सांगायचं होतं? असे विविध तर्क लावले जात आहेत. सलमान खान मुंबईतल्या वांद्रेत राहतो. वांद्रेत गॅलेक्सी असं त्याच्या इमारतीचं नाव आहे.

सलमान खान गॅलेक्सी इमारतीच्या पहिला आणि दुसऱ्या मजल्यात राहतो. यापैकी पहिल्या माळ्यातल्या गॅलरीतून सलमान खान आपल्या चाहत्यांना अभिवादन करतो. त्याच गॅलरीवर गोळीबार झाला. एक गोळी ग्रीलच्या खालच्या बाजूला, दुसरी गोळी गॅलरीतल्या आतल्या भिंतीला, आणि तिसरी गोळी गॅलरीबाहेरच्या भिंतीला लागली. सलमान खान चाहत्यांना या गॅलरीतून अभिवादन करतो आणि नेमक्या त्याच गॅलरीच्या खाली एक आणि पाठिशी एक गोळ्या झाडण्यात आल्या.

हल्लेखोरांनी 5 गोळ्या झाडल्या

गोळीबारानंतर मोटरसायकलवरुन आलेले दोन्ही फरार झाले. दोन्ही अज्ञातांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. माहितीनुसार, हल्लेखोरांनी एकूण ५ गोळ्या झाडल्या. त्यापैकी ४ सलमान खानच्या घरावर तर एक गोळी झाडली न गेल्यानं इमारतीच्या परिसरात जीवंत काडतूस सापडलं. गोळीबार झालेली ठिकाणं स्पॉट केल्यानंतर सलमान खानवर आम्ही हल्ला करु शकतो, हाच हल्लेखोरांना इशारा द्यायचा होता. हे स्पष्ट दिसतंय. कारण गोळीबारावेळी सलमान खानसह त्यांचं कुटुंब घरातच होतं.

सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर

सलमान खान लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर आहे. अनेकदा सलमानला धमक्याही मिळाल्या आहेत. बिश्नोई समाजात प्राण्यांना आणि खासकरुन हरणांना पूज्य मानलं जातं, म्हणून काळवीट शिकार प्रकरणापासून सलमान खानला बिश्नोई गँग इशारा देत आलंय. गोळीबारानंतर एक फेसबुक पोस्ट चर्चेत आलीय. अनमोल बिश्नोई या अकाऊंटद्वारे या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली गेलीय. पोलीस अकाऊंटची सत्यता पडताळत आहेत. दरम्यान, सांगण्यासारखे काहीच नाही. कारण, असले प्रकार करून त्यांना फक्त प्रसिद्धीच्या झोतात यायचं आहे, काळजी करण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया सलमान खानचे वडील सलीम खान यांनी दिलीय.

सलमानला सातत्याने धमक्या

काही महिन्यांपूर्वीच बिश्नोई टोळीनं सिद्धु मुसेवालाची हत्या केली. त्यानंतरही सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली गेली होती. याआधी सरकारी सुरक्षेत सलमान खानसोबत 1 पोलीस कॉन्स्टेबल असायचा. जर सलमान वैयक्तिक भेटीगाठीसाठी बाहेर पडला तर त्याच्यासोबत त्याचे 4 खासगी सुरक्षारक्षक असतात. आणि शुटिंग किंवा सार्वजनिक कार्यक्रमावेळी एकूण १० खासगी अंगरक्षकाचं सलमानभोवती सुरक्षाकडं असतं. त्यात नंतर सलमान खानला अजून 3 पोलीस कॉन्स्टेबल देण्यात आले होते. त्याही आधी काळवीट प्रकरणात सलमान तुरुंगात होता, तेव्हाही लॉरेन्स बिश्नोईनं सलमान मारण्याची खुलेआम धमकी दिली होती. कारण, सलमान कैदेत असलेल्या तुरुंगातच बिश्नोई टोळीचे 20 गँगस्टर बंद होते. पण पोलिसांच्या बंदोबस्तामुळे बिश्नोईचे मनसुबे पूर्ण झाले नाहीत.

2018 साली लॉरेन्स बिश्नोईनं संपत नेहरा नावाच्या त्याच्या शार्पशूटरला सलमानच्या हत्येची सुपारी दिली. हत्येसाठी संपत नेहरा मुंबईत पोहोचला. सलमान खान वांद्रेतल्या ज्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो, त्या घराची त्यानं रेकी केली. अनेक दिवस घराबाहेर थांबून त्यानं फोटो काढले. सलमान किती वाजता घराबाहेर पडतो, शुटिंगसाठी निघताना तो कोणत्या मार्गानं फिल्मसिटीत जातो, इथंपासून सर्व तयारी बिश्नोईच्या शार्प शूटरनं केली. सर्व माहिती गोळा झाल्यानंतर हल्लाची तारीख ठरवण्यासाठी संपत नेहरा पुन्हा हरियाणाला परतला. पण तेव्हाच हरियाणा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.