
“बिग बॉस सीझन 19” च्या ग्रँड फिनाले सुरु झाला आहे. 7 डिसेंबरच्या रात्री जाहीर होणार आहे “बिग बॉस सीझन 19”चा विजेता. प्रेक्षक आतुरतेने या क्षणाची वाट पाहत आहेत. आणि अंतिम ट्रॉफी कोण उचलणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. काही जण गौरव खन्नाचे नाव घेत आहेत, तर काही जण फरहाना भट्ट परंतु, ट्रेंडनुसार दुसराच स्पर्धक जिंकताना दिसत आहे. वोटर्सच्या ट्रेंडनुसार विजेता म्हणून जे नाव समोर येत आहे ते चाहत्यांना चकीत करणारे आहे.
हा स्पर्धक वोटमध्ये पुढे
सलमान खानच्या “बिग बॉस 19” च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये गौरव खन्ना, प्रणीत मोरे, फरहाना भट्ट, अमाल मलिक आणि तान्या मित्तल यांचा समावेश आहे. त्यांचे प्रवासाचे व्हिडिओ दाखवण्यात आले आहेत आणि फरहाना भट्टच्या व्हिडिओला झी हॉटस्टारवर सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 5 डिसेंबर रोजी शेअर केलेला तिचा प्रोमो व्हिडिओ आतापर्यंत 2,10,000 वेळा पाहिला गेला आहे. दरम्यान, गौरव खन्नाच्या व्हिडिओला फक्त 82,000 व्ह्यूज मिळाले आहेत. अमाल मलिकच्या व्हिडिओला 1,18,000 व्ह्यूज, तान्या मित्तलच्या व्हिडिओला 1,62,000 व्ह्यूज आणि प्रणित मोरेच्या व्हिडिओला 48,000 व्ह्यूज मिळाले आहेत. पण मतदानाचे ट्रेंड वेगळेच सांगत आहेत.
‘बिग बॉस 19’ टॉप 3
‘बिग बॉस व्होट.इन’ नुसार, 15 व्या आठवड्याच्या अंतिम फेरीच्या दिवशी ‘बिग बॉस 19’च्या ताज्या मतदानाच्या ट्रेंडमध्ये फरहाना, अमाल मलिक किंवा गौरव खन्ना ही नावे अव्वल स्थानावर नसून प्रणित मोरे 250,899 मतांसह आघाडीवर दिसत आहे. त्याच्यानंतर गौरव खन्ना 188,523 मतांसह दुसऱ्या स्थानावर दिसत आहे. याचा अर्थ ते सध्याच्या टॉप दोन मध्ये असल्याचं म्हटलं जात आहे आणि तिसर नाव येत आहे फरहानाचं.
तान्या आणि अमाल पडणार घराबाहेर?
फरहाना 1,45,147मतांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तान्या मित्तल 1,04,143 मतांसह चौथ्या स्थानावर आहे आणि अमाल मलिक सर्वात कमी मतांसह पाचव्या स्थानावर आहे, त्याला फक्त 28,450 मते मिळाली आहेत. या आधारावर शोचा विजेता नक्की कोण होईल हे अद्यापही समोर आलेले नाही आहे. परंतु, महाराष्ट्रातील मराठी मुलगा प्रणित मोरे आघाडीवर असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शेवटी रिझल्ट नक्की काय लागतो? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकही तेवढेच उत्सुक आहेत.