Pranit More Bigg Boss : वडील बस कंडक्टर, आई मेस चालवायची, कठीण संघर्षानंतर प्रणित मोरे बिग बॉसच्या विजेतेपदाच्या रेसमध्ये…
Pranit More : बिग बॉसचा ग्रँड फिनाले आज पार पडणार आहे. या शोच्या फिनालेमध्ये मराठमोळा स्पर्धक प्रणित मोरेवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. त्याचा प्रवास जाणून घेऊयात.

बिग बॉसचा ग्रँड फिनाले आज पार पडणार आहे. या शोच्या शुरुवातीपासून मराठमोळा स्पर्धक प्रणित मोरे चर्चेत आहे. त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. प्रणित हा मुंबईतील दादर येथील एका अरुंद चाळीत वाढला. त्याचे वडील बेस्ट बस कंडक्टर होते, तर त्याची आई मेस चालवायची. आयुष्यात अचानक आलेल्या एका वळणामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा संघर्ष करावा लागला. हाच प्रणित मोरे बिग बॉस 19 च्या अंतिम फेरीत पोहोचला असून विजेतेपदाच्या अगदी जवळ आहे. त्याचा प्रवास जाणून घेऊयात.
प्रणितचा जन्म मुंबईत झाला. त्याचे बालपण दादरच्या एका चाळीत गेले. त्याचे वडील बेस्ट बसमध्ये कंडक्टर होते. मात्र एका अपघातामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे त्यांना नोकरी गमवावी लागली. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट आले. त्यामुळे त्याचे कुंटुंब मुंबईहून नवी मुंबईला रहायला गेले. त्यांच्याकडे घर खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते, मात्र कुटुंबाचे पोट भरण्यासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. त्यामुळे प्रणितच्या पालकांनी मेस सुरू करण्याचा निर्णय घेतला.
प्रणित टिफिन डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा
प्रणित अभ्यासासोबतच त्याच्या पालकांना मदत करायचा. तो घरोघरी डबे पोहोच करायचा. मात्र त्याच्या कुटुंबावर पुन्हा संकट आले आणि त्याच्या वडिलांना नवीन व्यवसायात नुकसान झाले आणि त्यांना नवीन घर आणि दुकान विकावे लागले. त्यामुळे ते भाड्याच्या घरात राहू लागले. त्यावेळी प्रणितने आपल्या आईसाठी स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले होते.
आईचे स्वप्न पूर्ण केले
डबे घरोघरी पोहोचवत असताना प्रणितला खुप काही शिकवले. शिक्षण संपल्यानंतर तो कार सेल्समन म्हणून काम करू लागला. कालांतराने त्याचे कठोर परिश्रम, समर्पण आणि संघर्षामुळे तो आरजे बनला. त्यावेळी त्याच्या एका प्राध्यापकाने त्याला स्टँड-अप कॉमेडी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तो स्टँड-अप कॉमेडीकडे वळला आणि त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात त्याचे शो हाऊसफुल होऊ लागले. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी प्रणितने आपल्या कमाईने त्याच्या पालकांसाठी स्वतःचे घर खरेदी केले. बिग बॉसच्या घरात याबाबत बोलताना तो म्हणाला की, माझ्या आईची इच्छा होती की त्याने मुंबईत किंवा गावात त्यांच्यासाठी एक छोटे घर बांधावे. म्हणूनच त्याने मुंबईत त्याच्या पालकांसाठी स्वतःचे घर विकत घेतले.
प्रणित मोरे ट्रॉफी जिंकणार?
प्रणित मोरेचा बिग बॉसचा प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. जीवनातील संघर्षांवर मात करत तो आता विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. प्रणित मोरेचा प्रवास आपल्याला सांगतो की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी, तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत केली तर तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो. त्यामुळे आका प्रणित मोरे बिग बॉस ट्रॉफी जिंकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
