Bigg Boss 19 : ग्रँड फिनालेपूर्वीच बिग बॉस 19 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा, मोठी खळबळ, चक्क हा स्पर्धक…
Bigg Boss 19 Winner Name : बिग बॉस 19 च्या ग्रॅंड फिनालेला अवघे काही तासच शिल्लक असताना मोठी खळबळ उडाली आहे. बिग बॉस 19 च्या विजेत्याचे नाव फिनाले अगोदरच पुढे आले आहे.

बिग बॉस 19 धमाका करताना दिसले. आज बिग बॉस 19 चा फिनाले आहे. रात्री 9 वाजता हा फिनाले सुरू होईल. चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ या सीजनबद्दल बघायला मिळाली. बिग बॉस 19 ला त्यांचे 5 टॉप फायनलिस्ट मिळाली आहेत. त्यांच्यापैकी एकजण बिग बॉस 19 चा विजेता बनेल. मात्र, फिनालेला अवघे काही तास शिल्लक असतानाच बिग बॉस 19 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा झाली असून बिग बॉस 19 च्या विजेत्याचे नाव लिक झाले आहे. बिग बॉस सलमान खान होस्ट करतो. सलमान खान हा विजेत्याची नाव घोषित करतो. मात्र, यावेळी सलमान खान याने नाव जाहीर करण्याच्या अगोदरच विजेत्याच्या नावाची घोषणा झाली. थेट बिग बॉस 19 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. टॉप 2 स्पर्धेकांना सलमान खान स्टेजवर आणतो आणि दोघांपैकी एकाचा हात वर करत विजेत्याच्या नावाची घोषणा करतो. मात्र, यावेळी असे काहीही न होता फिनालेला काही तास शिल्लक असताना विजेत्याचे नाव पुढे आलंय.
सलमान खान याने बिग बॉस 19 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यापूर्वीच विकिपीडियाने विजेत्याचे नाव लीक केले आहे. बिग बॉस 19 विजेता असे आपण टाकले तर थेट नाव पुढे येत आहे. प्रणित मोरे, गौरव खन्ना, अमान मलिक, फरहाना भट्ट आणि तान्या मित्तल हे बिग बॉसचे टॉप 5 फायनलिस्ट आहेत. आपल्या आवडत्या स्पर्धेकाला विजेता बनवण्यासाठी चाहते प्रयत्न करत आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे अंतिम मतदान सुरू होण्यापूर्वीच विकिपीडियाने विजेत्याच्या नावाची घोषणा केली. ज्यामुळे निर्मात्यांनी विजेता आधीच ठरवला आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. शेवटचे वोटिंग फक्त एक ढोंग आहे का? हा देखील प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. विकिपीडियाने थेट गाैरव खन्ना याला बिग बॉस 19 चे विजेता म्हणून घोषित केले आहे. ज्याचा सध्या स्क्रीनशॉर्ट व्हायरल होत आहे.

Bigg Boss 19 Winner
यादरम्यान काही वेळातच विकिपीडियाने यामध्ये बदल केला आणि गाैरव खन्नाचे नाव फायनलिस्ट म्हणून लिहिले. मात्र, काही वेळ गाैरव खन्ना याचे नाव बिग बॉस 19 विजेता म्हणून प्रसिद्ध करण्यात आले होते. बिग बॉसच्या घरात गाैरव खन्ना धमाकेदार गेम खेळताना दिसला. मात्र, सलमान खान याने विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यापूर्वीच थेट विकिपीडियाने विजेत्याचे नाव जाहीर केले.
