AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजपाल यादवच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस , समोर ठेवली ही अट

बॉलिवूड अभिनेते राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. ५ कोटी रुपये सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी विभागात जमा करण्याच्या अटीवर त्याला आत्मसमर्पण करण्यापासून सवलत मिळाली आहे.

राजपाल यादवच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस , समोर ठेवली ही अट
Actor Rajpal Yadav
| Updated on: Sep 08, 2026 | 8:27 PM
Share

रिपोर्टर : कृष्णा सोनारवाडकर – बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या (Rajpal Yadav) अडचणी काही संपण्याचं नाव घेत नाहीत. चेक बाऊन्स प्रकरणी त्याच्याविरोधात सातत्याने कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि या प्रकरणात दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांची शिक्षा कायम ठेवत त्यांना शरण येण्याचे (सरेंडर करण्याचे) निर्देश दिले होते. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. मात्र मंगळवारी राजपाल यादवला दिलासा मिळाला. मंगळवारी सुप्रीम कोर्टाने अभिनेत्याला मोठा दिलासा दिला असून, त्याला सरेंडर करण्यापासून अंतरिम सूट देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी त्याच्यासमोर 5 कोटी रुपये जमा करण्याची अट घालण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी राजपाल यादव आणि त्याची पत्नी राधा राजपाल यादव यांच्या याचिकेवर सुनावणी केली. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. अभिनेत्याच्या वतीने वकील सौरभ त्रिवेदी यांनी या प्रकरणाचा उल्लेख केला होता.

काय म्हणालं सुप्रीम कोर्ट ?

‘ याचिकाकर्त्यांनी उद्यापर्यंत या न्यायालयाच्या नोंदणी विभागाकडे 5 कोटी रुपये जमा करावे, या अटीवर त्यांना आत्मसमर्पण करपासून सूट देण्यात येत आहे’ असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलं. तसेच या प्रकरणात मेसर्स मुरली प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह इतर संबंधित पक्षांकडून 15 सप्टेंबरपर्यंत उत्तर मागवण्यात आलं आहे.

10 सप्टेंबरला करायचं होत सरेंडर

दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राजपाल यादवला 10 सप्टेंबर रोजी सरेंडर करायचं होतं. चेक बाऊन्सशी संबंधित सात प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली होती. प्रत्येक प्रकरणात त्याला तीन महिन्यांची साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, या सातही शिक्षांचा कालावधी एकाच वेळी चालवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

या प्रकरणांमध्ये राजपाल यादव यांना तक्रारदाराला मोठी रक्कम देण्याचेही आदेश देण्यात आले होते. माहितीनुसार, त्यांना सुमारे 7.5 कोटी रुपये जमा करायचे होते.सुनावणीदरम्यान यापूर्वीच 2.25 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. आता सुप्रीम कोर्टाने सरेंडरपासून तात्पुरता दिलासा देताना आणखी 5 कोटी रुपये जमा करण्याची अट ठेवली आहे.

ही प्रकरणं M/s Murli Projects Pvt. Ltd. यांच्याशी संबंधित वादातून उद्भवली आहेत. तसेच, अभिनेत्याच्या निर्मिती कंपनीशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने चेक न वटल्याचे आरोप या प्रकरणांमध्ये करण्यात आले आहेत.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?