
९० च्या दशकात बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमधील गुंतागुंतीच्या कथा वारंवार समोर येत होत्या. अनेक गँगस्टर सेलिब्रिटीजना फिरौतीसाठी फोन करत, धमक्या देत आणि मोठी रक्कम मागत. काही सेलिब्रिटीजनी गँगस्टरना पैसे दिले, पण सुनिल शेट्टीने फोनवरच गँगस्टरला उलट धमकावले. त्यांनी इतक्या शिव्या दिल्या की, सर्वजण शांत झाले. सुनिल शेट्टीने नुकतेच या घटनेचा खुलासा केला आहे.
दिलेल्या मुलाखतीत उघड केलेले सत्य
सुनिल शेट्टीने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत गँगस्टर हेमंत पुजारीला शिव्या देण्याची घटना सांगितली. त्याने सांगितले की, हेमंतने त्यांच्या वडिलांना जीवघेणी धमकी दिली होती, ज्यामुळे अभिनेता प्रचंड संतापला होता. त्याने रागाच्या भरात हेमंतला शिव्या दिल्या.
वाचा: सुंदर काकीच्या प्रेमात दोन पुतणे, नवऱ्याने नको त्या अवस्थेत पकडलं अन्… कळल्यावर पोलिसांचाही घाम फुटला
धमक्यांचा प्रयत्न
सुनिल शेट्टीने सांगितले की, “त्या वेळी मुंबईत शेट्टी लोक काहीसे आक्रमक होते, कारण तो एक दबलेला समाज होता. शेट्टी आणि अंडरवर्ल्ड यांच्यामध्ये नेहमीच तणाव होता. मीही एक शेट्टी असल्यामुळे गँगस्टरना वाटत होते की, जर त्यांनी मला धमकावले किंवा नुकसान केले, तर शेट्टी समाज त्यांना पैसे देईल आणि त्यांच्यासमोर झुकेल. हेमंत पुजारी मला सतत फोन करत होता. तो माझ्या वैयक्तिक नंबरवर, ऑफिसवर, माझ्या मॅनेजरकडे, सर्वत्र फोन करत होता. त्याला वाटत होते की, असे करून तो मला घाबरवेल.”
शिव्या देऊन दिले उत्तर
सुनिलने पुढे सांगितले, “एकदा त्याने मला फोन करून सांगितले की, तो माझ्या वडिलांना गोळी मारेल. ते सकाळी मॉर्निंग वॉकला जातील तेव्हा त्यांना गोळी घालून मारेन. हे मला सहनच झाले नाही. त्याला मी शिव्या दिल्या आणि शांत केले. मी त्याला सांगितले की, मला त्याच्याबद्दल त्यापेक्षा जास्त माहिती आहे, जितके तो माझ्याबद्दल माहिती ठेवतो. माझ्याकडे त्यापेक्षा जास्त पैसे आणि कनेक्शन्स आहेत. म्हणून माझ्याशी मस्ती करु नकोस”
पोलिसांनी समजावले
सुनिल यांनी सांगितले, “संपूर्ण संभाषण रेकॉर्ड झाले आणि मी पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी मला सांगितले की, गँगस्टरवर रागावू नये. शिव्या देऊ नये. ते ट्रिगर ओढताना एकदाही विचार करणार नाहीत.”