‘गंगूबाई काठियावाड़ी’ वादाच्या भोवऱ्यात, अन्यथा न्यायालयात जाण्याची; नाव बदलण्याची काँग्रेस आमदारांची मागणी
काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी चित्रपटाच नाव बदल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे वादाच्या भोव-यात चित्रपट अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबई – अनेक दिवसांपासुन चर्चेत असलेला ‘गंगूबाई काठियावाड़ी’ (Ggangubai Kathiyawadi) येत्या २५ फेब्रुवारीला लोकांना थिअटरमध्ये पाहायला मिळणार होता, परंतु सध्या काँग्रेसच्या आमदारांनी नाव बदलण्याची मागणी केल्याने चित्रपट वादाच्या भोव-यात अड़कण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अलिया भट्ट ( Alia Bhat) या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून त्यांनी तिने गंगुबाईची भूमिका साकारली आहे. परंतु जर आमदार अमीन पटेल (amin patel) राज्य शासनाकडे हे प्रकरण नेलं तर चाहत्यांनी निराशा होईल. चित्रपत्रटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. त्यावेळी सुध्दा या चित्रपटाला विरोध करण्यात आला होता. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून येत्या 25 तारखेला रिलीज होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. फिल्म निर्माता संजय लीला भंसाली याचा हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापणार का ? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.
आमदारांची भूमिका
काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी चित्रपटाच नाव बदल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे वादाच्या भोव-यात चित्रपट अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच यावर कोणताही तोडगा निघाला नाहीतर शासनाकडे याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे सुध्दा अमीन पटेल यांनी सांगितले. जरी शासन दरबारी आमचं म्हणणं मान्य केलं नाहीतर आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे अमिन पटेल यांनी सांगितले. त्यामुळे चित्रपटाचं नेमकं काय होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. तसेच नावामुळे काठियावाडी हे नाव असल्याने शहराचं नाव खराब होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्या नावाला धक्का लागू नये यासाठी आम्ही नाव बदल करण्य़ाची मागणी करत आहोत असंही त्यांनी म्हणटले आहे. कामाठीपुरा हा खूप मोठा परिसर आहे, त्यामुळे एका गल्लीमुळे तो संपुर्ण परिसर खराब आहे असं होईल. आम्हाला विश्वास आहे की, यावर योग्य तोडगा निघेल.
गंगुबाईच्या मुलाने सुध्दा तक्रार केली होती
संजय लीला भंन्साळी यांचा प्रत्येक चित्रपट वादाच्या भोव-यात सापडतो हा इतिहास आहे, तसेच सध्या त्यांचा चित्रपट वादाच्या भोव-यात जाण्याची शक्यता अधिक आहे. गंगुबाईच्या मुलाने सुध्दा याबाबत प्रकार दाखल केली होती. पंरतु मुंबई उच्च न्यायालयाकडून या प्रकऱणाला स्थगिती देण्यात आली. या चित्रपटात गंगुबाईसाठी काही अपमानास्पद शब्द वापरण्यात आले होते. तसेच हा चित्रपट द माफिया क्वीन ऑफ मुंबई या कांदबरीबर आधारीत आहे.
